राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलची दशकपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:06+5:302021-05-21T04:10:06+5:30

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची २१ मे रोजी पुण्यतिथी आहे. त्यांची दूरदृष्टी आणि देशाला प्रगत राष्ट्र तयार ...

Decade of Rajiv Gandhi E-Learning School | राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलची दशकपूर्ती

राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलची दशकपूर्ती

Next

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची २१ मे रोजी पुण्यतिथी आहे. त्यांची दूरदृष्टी आणि देशाला प्रगत राष्ट्र तयार करण्याची जिद्द, उर्मी यामुळेच आज आपला देश एवढ्या प्रगतिपथावर पोहोचला आहे हे निःसंशय. विज्ञान तंत्रज्ञान ही आधुनिक विकासाची गुरुकिल्ली आहे, असे मानून स्व. राजीव गांधींचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मी सुमारे १२ वर्षांपूर्वी संकल्प केला आणि अतिशय जिद्दीने गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलांना संगणकाद्वारे शिक्षण देण्याचा प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार केला. महापालिकेच्या माध्यमातून प्रशस्त राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल साकारले गेले. पुणे महापालिकेच्या या शाळेची यंदा दशकपूर्ती होत आहे.

महापालिकेच्या माध्यमातून मी गेल्या सहा टर्ममध्ये म्हणजे सुमारे ३० वर्षांत अनेक लोकोपयोगी प्रकल्प साकारले. त्यापैकी राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल. ई-लर्निंग स्कूलला राजीव गांधी यांचे नाव देण्यातही मोठी दूरदृष्टी होती. स्व. राजीव गांधी यांच्यामुळे भारतात संगणक क्रांतीला सुरुवात झाली. त्या राजीव गांधींचे नाव या शाळेला देऊन विशेष औचित्य साधले गेले. येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे प्ले ग्रुप ते १२ वी पर्यंतची शाळा व विशेष म्हणजे या शाळेत परिसरातील, झोपडपट्टीतील,गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देऊन हा प्रयोग यशस्वी केला.

या शाळेचे यंदा १० वे वर्ष आहे. २०११ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या वास्तूचे उदघाटन झाले.

राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलची वैशिष्ट्ये -

* प्रशिक्षित शिक्षक

* 40 इंची टीव्हीवर कॉम्प्युटरद्वारे शिकवण्यासाठी क्लासरूम

* प्रत्येकी शंभर कम्प्युटरच्या दोन कॉम्प्युटर लॅब

* विद्यार्थ्यांना सकाळी दूध, नाश्ता व दुपारचे पौष्टिक भोजनाची व्यवस्था

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचा विकास होण्यासाठी ऑडिटोरियम

* कौशल्य विकासातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण

* ॲडव्हान्स असलेले थ्रीडी प्रिंटिंग व रोबोटिक्सचे प्रशिक्षण

* विद्यार्थ्यांना शालेय गणवेश ड्रायक्लिनिंग व प्रेस करून देण्याची व्यवस्था

* विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोग करण्यासाठी भव्य व सुसज्ज प्रयोगशाळा. विद्यार्थ्यांना भूगोलाचे ज्ञान मिळण्यासाठी पाचव्या मजल्यावर प्रशस्त विलासराव देशमुख ३-डी तारांगणही आहे. ही सारी वैशिट्ये राजीव गांधी स्कूलची आहेत.

राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल ही १ लाख स्क्वेअर फूट जागेत उभारली असून, ५ मजली इमारत आहे. ज्युनिअर केजी ते १२ वीपर्यंत शिक्षण येथे दिले जाते. १० वीपर्यंत सीबीएससी बोर्डचे शिक्षण देणारी महापालिकेची देशातील एकमेव शाळा आहे. शाळेत १५०० विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. ११ वी १२ वीमध्ये सायन्स व जेईईचे शिक्षण दिले जाते. दर वर्षी शाळेचा १०० टक्के निकाल लागत असून, जेईई मेन्समध्ये दर वर्षी उत्तुंग यश मिळवत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, देशात अव्वल येण्याचा बहुमान देखील या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील १६३ विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये प्रवेश घेऊन पुणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुणे महापालिकेकडून प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान विद्यार्थ्यांना मिळाले आहे.

राजीव गांधी- ईलर्निंग स्कूलमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच ब्यूटी पार्लर, टूरिस्ट गाइड, नर्सिंग, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, लॅण्डस्केपिंग, इंटरियर डिझाईनिंग,थ्रीडी प्रिंटिंग,रोबोटिक्स अशा विविध प्रकारच्या कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते.

राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल देशातील मॉडेल बनले आहे. थोर समाजसुधारक कै. बाबा आमटे याचे नातू यांनी देखील शाळेस भेट देऊन त्यांच्या भागात असा शैक्षणिक प्रकल्प सुरू करणार असल्याचे सांगितले. देशाला विज्ञानाची व संगणकाची दृष्टी देणाऱ्या व बळ देणाऱ्या राजीव गांधींच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो.

- आबा बागूल,

गटनेते,काँग्रेस पक्ष

पुणे महापालिका

Web Title: Decade of Rajiv Gandhi E-Learning School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.