डेक्कन चार्जर्स संघाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:44+5:302021-03-21T04:11:44+5:30

पुणे : तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत गतविजेत्या डेक्कन चार्जर्स संघाने फर्ग्युसन ...

Deccan Chargers win the title | डेक्कन चार्जर्स संघाला विजेतेपद

डेक्कन चार्जर्स संघाला विजेतेपद

Next

पुणे : तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत गतविजेत्या डेक्कन चार्जर्स संघाने फर्ग्युसन कॉलेज अ संघाचा पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद संपादन केले.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या सामन्यात १०० अधिक गटात डेक्कन चार्जर्सच्या अजय कामत व मदन गोखले यांनी एफसी अ संघाच्या संजय रासकर व पुष्कर पेशवा यांचा तर, ९० अधिक गटात डेक्कन चार्जर्सच्या जयदीप दाते व चिराग शहा या जोडीने पंकज यादव व मनोज कुलकर्णी यांचा पराभव करून आघाडी घेतली.

त्यानंतर खुल्या गटात एफसी संघाच्या संग्राम चाफेकर व यश देशमुख यांनी डेक्कन चार्जर्सच्या मुकुंद जोशी व ऋषिकेश पाटसकर या जोडीचा पराभव करून आघाडी कमी केली. खुल्या गटात डेक्कन चार्जर्सच्या आशिष पुंगलिया व चिराग रुणवाल यांना एफसी संघाच्या दिविजा गोडसे व पुष्कर पेशवा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण सुरुवातीपासूनच वर्चस्व राखणाऱ्या डेक्कन चार्जर्स संघाने फर्ग्युसन कॉलेज अ संघावर विजय मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या संघाला २० हजार रुपये व करंडक तर उपविजेत्या संघाला १० हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. शरद आगरखेडकर आणि फर्ग्युसन कॉलेजचे रणपिसे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम फेरी :

डेक्कन चार्जर्स वि.वि.एफसी अ १८-१३

१०० अधिक गट : अजय कामत-मदन गोखले वि.वि. संजय रासकर-पुष्कर पेशवा ६-०,

९० अधिक गट : जयदीप दाते-चिराग शहा वि.वि. पंकज यादव-मनोज कुलकर्णी ६-१,

खुला गट : मुकुंद जोशी-ऋषिकेश पाटसकर पराभूत वि. संग्राम चाफेकर-यश देशमुख २-६,

खुला गट : आशिष पुंगलिया-चिराग रुणवाल पराभूत वि. दिविजा गोडसे-पुष्कर पेशवा ४-६.

Web Title: Deccan Chargers win the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.