डेक्कन जिमखाना, केडन्स, व्हेरॉक, पीवायसी उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:46+5:302021-03-23T04:11:46+5:30

पुणे : डेक्कन जिमखाना, केडन्स, व्हेरॉक, पीवायसी यांनी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवताना केडन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश ...

Deccan Gymkhana, Cadence, Verrock, PYC in the semifinals | डेक्कन जिमखाना, केडन्स, व्हेरॉक, पीवायसी उपांत्य फेरीत

डेक्कन जिमखाना, केडन्स, व्हेरॉक, पीवायसी उपांत्य फेरीत

Next

पुणे : डेक्कन जिमखाना, केडन्स, व्हेरॉक, पीवायसी यांनी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवताना केडन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवारी उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.

नेहरू स्टेडियमवर झालेल्या डेक्कन जिमखाना आणि कॉम क्बल या लढतीत पावसाचा व्यत्यय आला. डेक्कन जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना २२ षटकांत नऊ बाद १५६ धावा केल्या. कॉम संघाने ४.१ षटकांत एक बाद २३ धावा केल्या असताना पावसामुळे सामना थांबवण्यात आला.

दुसऱ्या लढतीत व्हेरॉकने सेंट्रल झोन संघावर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना सेंट्र झोनने ४४.४ षटकांत सर्वबाद १८५ धावा केल्या. व्हेरॉकने २९.५ षटकांत सहा बाद १८६ धावा करत विजय मिळवला. सेंट्रल झोनकडून किरण चोरमाले (७०), देव नवले (३३) यांनी झुंज दिली. व्हेरॉककडून तिलक जाधवने तीन तर सोहम जमाले आणि ओंकार राजपूत यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हेरॉककडून हर्ष खांदवे (६४), आदित्य एकशिंगे (नाबाद ३८) यांनी संघाचा विजय साकारला. तिलक जाधवला सामनावीर किताब देण्यात आला.

पीवायसी मैदानावर झालेल्या लढतीत पीवायसीने धावगतीच्या जोरावर युनायटेड क्लबविरुद्ध विजय मिळवला. पीवायसीने ४९.५ षटकांत सर्वबाद १९६ धावा केल्या. पावसामुळे ३२.४ षटकांत सहा बाद ११६ धावांवर खेळ थांबवण्यात आला. पीवायसीकडून यश माने (५८), आदर्श बोथरा (४०) यांनी झुंजार फलंदाजी केली. युनायटेडकडून रौनक राठी याने पाच गडी बाद केले. युनायटेडकडून रोहित खरात याने सर्वाधिक ३१ धावा केल्या. धावगतीच्या आधारे पीवायसीला या लढतीत विजयी घोषित करण्यात आले.

वेस्ट झोन पराभूत

केडन्सने वेस्ट झोनवर तीन गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेस्ट झोनने प्रथम फलंदाजी करताना ४४.२ षटकांत सर्वबाद २१२ धावा केल्या. वेस्ट झोनकडून हर्षवर्धन जाधवने सर्वाधिक ७५ धावा केल्या. केडन्सकडून राझेक फल्ला आणि आर्या जाधव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. केडन्सकडून कौशल तांबे (५६), प्रद्युम्न चव्हाण (नाबाद ३८), आर्यन गोजे (३३) यांनी संघाचा विजय साकारला. कौशल तांबे सामनावीर ठरला.

Web Title: Deccan Gymkhana, Cadence, Verrock, PYC in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.