डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका

By अजित घस्ते | Published: May 17, 2024 05:49 PM2024-05-17T17:49:52+5:302024-05-17T17:50:19+5:30

ऐनवेळी रेल्वे रद्द केल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.

Deccan Queen two, while Progress six days cancelled; Decision of Railway Administration | डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका

डेक्कन क्वीन दोन, तर प्रगती सहा दिवस रद्द; रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका

पुणे: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनवरील प्लॉट फॉर्म क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे शेवटच्या थांबा असलेल्या स्थानकावर डेक्कन क्वीन दोन दिवस, तर प्रगती सहा दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच शुक्रवार (दि. १७)पासून काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत.

सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. आता ऐनवेळी रेल्वे रद्द केल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. तसेच काही गाड्या (दि. १७ ते २७ मे) दरम्यान दादर स्थानकापर्यंत धावतील. तसेच परतीचा प्रवास दादर येथूनच करावा लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामध्ये पुणे-मुंबई धावणार्‍या इंटरसिटी एक्स्प्रेसचा ही  समावेश आहे.  

रद्द केलेल्या गाड्या...

पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस (दि. २८मे ते २ जून)
पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (दि. ३१ ते २ जून)
पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस (दि. १ व २ जून)
पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (दि. १ व २ जून)
कुर्ला-मडगाव-कुर्ला (दि. १ व २ जून)

दादरपर्यंत धावणार्‍या गाड्या...

मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस
हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस
भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस
साईनगर शिर्डी-मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
होस्पेट-मुंबई-होस्पेट एक्स्प्रेस

रेल्वे विभागाने काम करण्यास वेळ लागत होता. तर चार महिने पूर्वी रेल्वेने बुकिंग करुन प्रवाशांना काय फायदा होणार. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना याचा फटका बसत आहे. -हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

Web Title: Deccan Queen two, while Progress six days cancelled; Decision of Railway Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.