देवाला दान करायचे आहे सांगून महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:20 AM2021-02-06T04:20:29+5:302021-02-06T04:20:29+5:30
नंदिनी पवळे यांचा शिरोली येथे चहा व पानटपरी यांचा व्यवसाय आहे. गुरुवारी (दि. ४) ३ च्या ...
नंदिनी पवळे यांचा शिरोली येथे चहा व पानटपरी यांचा व्यवसाय आहे. गुरुवारी (दि. ४) ३ च्या सुमारास त्या दुकानात असताना दोन भामटे दुचाकीवरून त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी पवळे यांना या ठिकाणी मारुती मंदिर कुठे आहे असे भामट्याने विचारले. तसेच माझी आई आजारी आहे. त्यामुळे मला देवाला व गोरगरिबांना दान करायचे आहे, असे सांगितले. पवळे यांनी दोघांना मंदिराचा पत्ता सांगितला. मात्र भामट्यांनी आम्हाला वेळ नाही असे म्हणून बिस्किट पुडे, द्राक्षे, व पूजा करण्याचे सामान भरून आणलेली पिशवी व त्यानंतर पाचशे रुपयांच्या ३ नोटा पवळे यांच्याकडे दिल्या. तसेच पूजेसाठी सोने लागते. आमचा अजून एक माणूस सोने घेऊन येणार होता. तो आला नाही. तोपर्यत तुमच्या गळ्यातील सोने द्या. ते तुम्हाला परत देतो असे सांगून या महिलेचा विश्वास संपादन केला. पाचशे रुपयांच्या नोटा व पवळे या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे सोने भामट्यांनी एकत्र पुडीमध्ये बांधून पिशवीत ठेवून १० ते १५ मिनिटे देवासमोर ठेवा. तुमचे सोने काढून घ्या, व इतर वस्तू गोरगरिबांना वाटून टाका, असे सांगून निघून गेले. १५ मिनिटांनी पवळे यांनी पिशवी उघडून पाहिली. बांधलेल्या पुडीत त्यांनी दिलेला सोन्याचा दागिना त्यांना दिसून आला नाही. आपली फसवणूक झाली, असे पवळे या महिलेच्या लक्षात आले.