कार्यालयाच्या आकारावर ठरवा वऱ्हाडींची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:01+5:302021-03-23T04:11:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लग्न कार्यातील उपस्थितीवर घातलेले बंधन आचारी यांच्या व्यवसायावर गदा आणणारे ...

Decide on the size of the office and the number of brides | कार्यालयाच्या आकारावर ठरवा वऱ्हाडींची संख्या

कार्यालयाच्या आकारावर ठरवा वऱ्हाडींची संख्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लग्न कार्यातील उपस्थितीवर घातलेले बंधन आचारी यांच्या व्यवसायावर गदा आणणारे ठरत आहे. त्यामुळेच न्यू पुणे कॅटरिंग असोसिएशनने आता, कार्यालयांचा आकार पाहा व त्यावर उपस्थितांची संख्या निश्चित करा, अशी मागणी केली आहे.

राज्य सरकारबरोबरच शिवसेना नेते व महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनाही याबाबतचे निवेदन दिले आहे.

सर्वसाधारण स्थितीत गर्दी म्हणजे, व्यक्ती एकदम शेजारी-शेजारी असणे. कोरोनासाठी सुरक्षित अंतर म्हणजे दोन व्यक्तींमध्ये साधारण १० ते २५ फूट अंतर. त्यातून ५० पेक्षा जास्त संख्या नको हा विचार आला. मात्र, त्यामुळे कॅटरिंग व्यवसाय धोक्यात आला, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. त्याऐवजी कार्यालयाचे क्षेत्रफळ विचारात घ्यावे व त्यावर आधारित उपस्थितांची संख्या निश्चित करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश माळी, उपाध्यक्ष मनोहर गौड, जे.डी. शाहजी, जी.एस. बिंद्रा, सुखदेव सिंग चारण, मनोज वैष्णव, कुणाल परदेशी, दशरथ राजपुरोहित, कालू महाराज, अर्जुन सिंग, विजय मिश्रा, दिलीप राजपुरोहित, प्रताप राठोड, समीर ठाकूर, संतोष मकुडे, प्रताप माळी, अण्णा कुदळे यांनी निवेदन दिले आहे.

माळी यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या लग्नसराईतही कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत होता. आता परवानगी आहे, पण फक्त ५० उपस्थितींच्या नियमाने परत तो बंदच ठेवण्याची वेळ आली आहे. फक्त कॅटरिंगच नाही, तर लग्नसराईवर अवलंबून असलेले फुलवाले, सौंदर्य प्रसाधन, सोहळे व्यवस्थापक, वाजंत्रीवाले, छायाचित्रकार, छापखाने, शिवणकाम करणारे, तयार कपड्यांचे व्यावसायिक, प्रवासी वाहने भाडेतत्त्वावर देणारे असे सगळेच अडचणीत आहेत. सलग दुसऱ्या वर्षीही आर्थिक फटका बसल्यास हे उद्योग बंदच पडतील. त्यामुळे उपस्थितांची संख्या वाढवावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: Decide on the size of the office and the number of brides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.