‘होम आयसोलेशन’ बंद करण्याचा निर्णय अव्यवहार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:16+5:302021-05-26T04:11:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना पुण्यासह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन (गृह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना पुण्यासह राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा निर्णय अव्यवहार्य असून, त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
महापौर मोहोळ म्हणाले की, अशा प्रकारचा निर्णय घेण्याची आत्ता तरी ही वेळ नाही. सध्या सोसायट्यांच्या परिसरात जास्त रुग्ण आढळून आले. दुसऱ्या लाटेतील बहुतांश रुग्णांकडे गृहविलगीकरणाची सोय उपलब्ध होती. यामुळे असे रुग्ण घरच्या घरीच बरे झाले ही वस्तुस्थिती आहे.
राज्य सरकारच्या ‘होम आयसोलेशन बंदी’च्या निर्णयामुळे कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटरची निर्मिती नव्याने करावी लागणार आहे. त्यासाठी वेगळे मनुष्यबळ आणि पैसे खर्च होईल. त्यातच कोविड केअर सेंटर कोण उभारणार, याचीही स्पष्टता नाही. शिवाय, जर या नियमांची अंमलबजावणी केलीच तर याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण, पहिल्या लाटेत असणारी नागरिकांची मानसिकता आणि या लाटेत असणारी मानसिकता यात फरक आहे. दुसऱ्या लाटेत जवळपास ८० टक्के रुग्णांची ‘होम आयासोलेशन’चा पर्याय अवलंबला होता, हेही लक्षात घेणे गरजेचे असल्याचे मोहोळ यांनी सांगितले़
-------------------------