कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:48+5:302021-09-04T04:15:48+5:30

बारामती : तालुक्याच्या ठिकाणची कोविड सेंटर बंद करण्याचा राज्यसरकारचा निर्णय धक्कादायक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण ...

The decision to close the Kovid Center is shocking | कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक

कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक

Next

बारामती : तालुक्याच्या ठिकाणची कोविड सेंटर बंद करण्याचा राज्यसरकारचा निर्णय धक्कादायक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असताना कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तालुका ठिकाणची कोविड सेंटर बंद करू नयेत, अशी मागणी माजीमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

राज्यशासन हे कोविडची तिसरी लाट येणार आहे. त्यास तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देत आहे. अशी काळजीची परिस्थिती असताना शासनाकडूनच चक्क कोविडचे रुग्ण कमी झाल्याचे कारण देत जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर १ सप्टेंबरपासून बंद करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. इंदापूर येथीलही कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील रुग्णांना आता उपचारासाठी थेट बारामती येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इतक्या लांब ठिकाणी रुग्णांची व जनतेची गैरसोय होणार नाही का? शासनास हे समजत नाही का? असा सवाल ही पाटील यांनी उपस्थित केला आहे. इंदापूर येथील कोविड सेंटर बंद करणे ही शासनाने तालुक्यातील जनतेची चालवलेली चेष्टा असल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

चौकट

जनतेच्या आरोग्याशी खेळ...

कोविड-१९ अंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या कारणामुळे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. सध्या आरोग्य व्यवस्था मजबूत करणे महत्त्वाचे असताना, शासनच आहे ती पदे रद्द करून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. शासनाने हा पोरखेळ थांबवावा. केंद्र सरकारला काही झाले की जबाबदार धरू नये. राज्य शासनाने स्वत: जबाबदारी घेतली पाहिजे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

----------------------

शासनस्तरावर वरिष्ठांना भेटणार...

कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करण्याचा इशारा मुख्यमंत्री देत आहेत. मुख्यमंत्री कोरोनासंदर्भात गंभीर दिसत आहेत. कोरोना रुग्णांवरती तालुक्यामध्ये जवळच तात्काळ चांगले उपचार मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर बंद करण्याच्या निर्णया संदर्भात आम्ही शासनस्तरावर वरिष्ठांची भेट घेणार असून, तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना केअर सेंटर बंद करू देणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

___________________________--------------------

फोटो - हर्षवर्धन पाटील

----------------------

फोटो मेल केला आहे. बातमी फोटोसह घ्यावी.

----------------------

Web Title: The decision to close the Kovid Center is shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.