ठळक मुद्देउमेदवाराच्या खर्चासाठी जिल्हादर सुची उमेदवाराला खर्चासाठी ७० लाख रूपयांची मर्यादापोस्टर, बॅनर या प्रचार साहित्याचीही दरसुची
ref='http://www.lokmat.com/topics/pune/'>पुणे :
निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या दिलेल्या खर्चासाठी जिल्हा दर सुचीमध्ये वडापाव १२ रुपये नग व पुरीभाजी २५ रुपये नग असे दर दिले आहेत. आयोगाने दिलेल्या दरापेक्षा जास्त दर असेल तर चालेल, पण त्यांनी दिलेल्या दरापेक्षा कमी दर मात्र मंजूर केले जाणार नाहीत, असे आयोगाकडून स्पष्ट केले आहे. उमेदवाराला खर्चासाठी ७० लाख रूपयांची मर्यादा असून त्याला आता कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चावरही मर्यादा आणावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे उमेदवाराला त्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून ते थेट मतदान होईपर्यंतचा दैनंदिन खर्च रोजच्या रोज सादर करावा लागतो. या खर्चात उमेदवाराकडून अनेकदा बऱ्याच वस्तुंचे दर बाजारभावापेक्षा कमी दाखवले जातात. एकूण ७० लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत सगळे बसवायचे असल्यामुळे असे बहुसंख्य उमेदवारांकडून केले जात असते. त्यामुळे आयोगाने प्रचार व कार्यकर्त्यांसाठी लागणाºया अनेक नानाविध वस्तुंचा बारकाईने विचार करून एक दर सुचीच जाहीर केली आहे. फक्त प्रचारसभेच्या खर्चातच एकूण ४२ प्रकारच्या खर्चाचा विचार आयोगाने केला आहे. त्यात मांडवापासून ते हारतुऱ्यांपर्यंत व पाण्याच्या बाटलीपासून ते कार्यकर्त्यांसाठी द्याव्या लागणाऱ्या खाण्याच्या भत्त्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. मंडप, त्यावरचे लाईट, साधे व एलईडी, पंखे, टेबल व सिलिंग, गादी, उशी, अशा अनेक गोष्टींचे नगनिहाय दर या सुचीत देण्यात आले आहेत. त्यातच वडापाव १२ रुपये , पुरीभाजी २५ रुपये, बिसलेरी बाटली १२ चा संच १२० रुपए, २० लिटरचा जार ३५ रुपये असे दर आहेत.प्रचार सभेनंतर फेटे (प्रति नग १५० रुपये), गांधी टोपी (प्रति नग १५ रुपये),
पुणेरी पगडी (प्रति नग ३५० रुपये) यांचा खर्च दिला आहे. प्रचार कार्यालयातील टेबल, खुर्च्या, गादी, उशी यांचे भाडे प्रतिदिन प्रतिनग असे नमुद करण्यात आले आहे. स्टेशनरी मध्ये साध्या टाचणीपासून स्टेपलरपर्यंत सगळ्यांचा विचार करण्यात आला आहे. पोस्टर, बॅनर या प्रचार साहित्याचीही दरसुची देण्यात आली आहे. उमेदवाराने त्याच्या दैनंदिन खर्चात या गोष्टी असल्यास जिल्हा दरसुचीत असलेलेच दर नमुद करायचे आहेत. त्यापेक्षा कमी दर असले तर ते मान्य होणार नाहीत, त्याची चौकशी करण्यात येईल असेही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना जिल्हा दर सुची देताना सांगण्यात आले आहे. यातील काही दरांवर काँग्रेसने हरकत घेतली आहे. सभेसाठी लागणाºया प्लॅस्टिक खुर्च्या बाजारभावाप्रमाणे फक्त १० रुपए भाडेतत्त्वावर उपलब्ध होत असताना आयोगाच्या दरसुचीत प्रत्येक खुचीर्चा दर २८ रुपये नमुद करण्यात आला आहे. तो कमी करण्यात यावा, तसेच अन्य काही वस्तूंचे दर बाजारभावापेक्षा बरेच जास्त असल्यामुळे त्याचाही विचार करावा असे काँग्रेसने आयोगाला कळवले असून येथील निवडणूक कार्यालयातही हरकत नोंदवली आहे.
Web Title: Decision of fix rates in election period materials by Commission ; Vada Pav 12, Puribhaji 25 rupees
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.