एमपीएससी परीक्षेचा निर्णय सरकारने जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:41+5:302021-04-08T04:11:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या ...

The decision of MPSC examination should be announced by the government | एमपीएससी परीक्षेचा निर्णय सरकारने जाहीर करावा

एमपीएससी परीक्षेचा निर्णय सरकारने जाहीर करावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या ११ एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा घेणार आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. समन्वय समितीने गेल्या आठवड्यात परीक्षार्थींचे मत आजमावले. टेलिग्रामवर मतही आजमाविले. यात सहभागी आठ हजार विद्यार्थ्यांपैकी ५१ टक्के जणांनी परीक्षा घेण्याच्या बाजूने मत दिले होते. मात्र, जसजशी बाधितांची संख्या वाढत आहे, तसतशी परीक्षा पुढे ढकलण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

राज्यासह देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे.

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना प्राणास मुकावे लागले आहे. पुण्यात अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी कोरोना लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत. काहींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काही जण परीक्षेनंतर रुग्णालयात जाऊ असा विचार करीत आहेत. मध्यप्रदेश आणि बिहारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील बाधितांची संख्या लक्षात घेता सरकारने आपला निर्णय जाहीर करवा. त्या नुसार विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल, अशी विनंती एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, महेश घरबुडे, अरुण पाटील, विश्वंभर भोपळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

---

परीक्षा पुढे ढकलण्याकडे वाढला कल

एमपीएससी समन्वय समितीने टेलिग्रामवर विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी का? असा प्रश्न विचारला. या कल चाचणीत २७ हजार ९०७ विद्यार्थी सहभागी झाले. त्यातील ६२ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या बाजूने मत दिले.

Web Title: The decision of MPSC examination should be announced by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.