कारवाई रद्दसाठी संघटना सक्रिय, तुकाराम मुंढे यांनी घेतलेले पीएमपीबाबतचे निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 05:24 AM2018-02-11T05:24:42+5:302018-02-11T05:24:55+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी, कर्मचारी संघटना सक्रिय झाल्या आहेत. आस्थापना आराखडा, शेकडो कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन, बदल्या, रजा अशा विविध निर्णयांवर संघटनांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द करण्यासाठी, कर्मचारी संघटना सक्रिय झाल्या आहेत. आस्थापना आराखडा, शेकडो कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन, बदल्या, रजा अशा विविध निर्णयांवर संघटनांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता काही निर्णय व कारवाई बेकायदेशीर असल्याचे नवीन अध्यक्षांना पटवून देत, ते रद्द करण्यासाठी संघटना सक्रिय झाल्या आहेत.
मुंढे यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारल्यानंतर, कर्मचाºयांमध्ये शिस्त आणण्यासाठी कारवाइचा धडाका सुरू केला. सातत्याने गैरहजर राहणे, पूर्वपरवानगीने घेणाºया शेकडो कर्मचाºयांचे निलंबन, बडतर्फ करण्यात आले. सध्या दीडशेहून अधिक रोजंदारी वाहकांची, तर ३५० हून अधिक कायम सेवेतील कर्मचाºयांची गैरहजेरीबाबत चौकशी सुरू आहे. अंध व अपंग कर्मचाºयांची सेवाही समाप्त करण्यात आली. काही अधिकाºयांवरही मुंढे यांनी कारवाई केली. काहींच्या पदोन्नत्या रद्द केल्या. यातील काही निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे.
आराखड्यामध्ये पदे व वेतनश्रेणी कमी करणे, बदल्यांमुळे अनेक कर्मचाºयांना नाहक त्रास, एक रजा; तसेच ससूनच्या प्रमाणपत्राच्या आग्रहावरही संघटना; तसेच संबंधित कर्मचारी संतप्त झाले होते. त्यामुळेच मुंढे यांच्या बदलीनंतर संघटनांनी आनंद व्यक्त करीत मुंढे यांचा निषेधही केला. आता मुंढे यांनी घेतलेले काही निर्णय कर्मचाºयांवर अन्याय करणारे आणि बेकायदेशीर असल्याने ते बदलण्यासाठी संघटनांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे संघटनांच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
निर्णयांवर संघटनांची नाराजी
दहा वर्षे रखडलेला आस्थापना आराखडा नव्याने तयार करून, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली. सेवा-शर्ती, पदभरती, पात्रता, पदोन्नती, वेतनश्रेणी हे निश्चित केले. प्रशासकीय कारण देत हजारो कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. महिन्यातून केवळ एकच रजा देण्याचा निर्णय घेतला; तसेच वैद्यकीय रजेसाठी केवळ ससून रुग्णालयातील प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात आहे. या सर्वच निर्णयांवर संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
सेवा समाप्त करण्यात आलेले कर्मचारी, रजेचा निर्णय, वैद्यकीय प्रमाणपत्र याबाबत नवीन अध्यक्षांकडे पाठपुरावा केला जाईल. हे निर्णय चुकीचे असल्याचे त्यांना पटवून देऊ. बेकायदेशीर बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देत, ते निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मुंढे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले; पण कर्मचाºयांवर मात्र अन्याय केला.
- सुनील नलावडे,
सरचिटणीस, पीएमपी राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन
तुकाराम मुंंढे यांनी घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांवर नवीन अध्यक्षांकडे निश्चितपणे दाद मागितली जाणार आहे. संबंधित निर्णयांवर कायदेशीर बाजू तपासून जे चुकीचे निर्णय आहेत ते रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल. कर्मचारी-अधिकाºयांची चौकशी न करता कारवाई करण्यात आली. कामचुकारांवर कारवाईला आमचा विरोध नाही; पण त्यांच्यासोबत इतर प्रामाणिक कर्मचाºयांवरही कारवाई करण्यात आली. हे बेकायदेशीर असल्याने त्याकडे लक्ष वेधले जाईल.
- राजेंद्र खराडे, अध्यक्ष,
पीएमटी कामगार संघ (इंटक)