कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:03+5:302021-07-21T04:09:03+5:30
पुणे नाशिक तसेच नगर कल्याण व पिंपळगाव जोगा कालव्यासाठी आळे संतवाडी कोळवाडी परिसरातील शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. याच ...
पुणे नाशिक तसेच नगर कल्याण व पिंपळगाव जोगा कालव्यासाठी आळे संतवाडी कोळवाडी परिसरातील शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. याच परिसरातून आता पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी सुपीक अशा जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने ज्या शेतक-यांच्या जमिनी यामध्ये रेल्वे मार्गासाठी जाणार आहेत. त्यांची बैठक वेद बोलवलेल्या रेडा समाधी स्थळ येथे झाली.
या बैठकीत पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे आळे सरपंच प्रितम काळे संतवाडी सरपंच नवनाथ निमसे कोळवाडी उपसरपंच दिनेश सहाणे देवस्थान अध्यक्ष चारूदत्त साबळे माजी उपसरपंच धनंजय काळे, किशोर कु-हाडे, शरद गाढवे, अरूण हुलवळे, अमित सहाणे, अनिल वाघोले, निलेश भुजबळ यांनी संपादित जमिनीची नुकसान भरपाई, आळेफाटा रेल्वेस्थानक, रेल्वे मार्गालगतचे रस्ते यासह इतर बांबीविषयी आपली मते मांडली. यावेळी देवस्थान उपाध्यक्ष अविनाश कु-हाडे सचिव संतोष पाडेकर विश्वस्त म्हतुजी सहाणे, अॅड सुदर्शन पाटील भुजबळ, बाळासाहेब शेळके, अजित सहाणे, गणेश गुंजाळ, रामदास शेळके, कान्हू पाटील कु-हाडे, पवन डोके, अमर सहाणे, नामदेव कु-हाडे यांचेसह शेतकरी उपस्थित होते. यामध्ये कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय शेतकरीवर्गाने घेतला.
रेल्वे मार्गासाठी जमिनी संपादित होणा-या शेतक-यांची वेद बोलवलेल्या रेडा समाधी स्थळ येथे झालेली बैठक.