स्थायी समितीचे निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:30+5:302021-06-16T04:12:30+5:30
पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविडकाळात केलेल्या कामामुळे एक वेतनवाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिलेली आहे. आता कोविडकाळात ...
पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविडकाळात केलेल्या कामामुळे एक वेतनवाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिलेली आहे. आता कोविडकाळात केलेल्या विविध विभागांतील कर्मचारी अधिकाऱ्यांनाही एक वेतनवाढ देण्यात येणार आहे.
---
क्षयरोग नियंत्रण कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रक कार्यक्रमांतर्गत पालिकेत कार्यरत असणाऱ्या ४८ कर्मचाऱ्यांना वैद्यकीय लाभ, सुरक्षा कवच आणि जोखीम भत्ता देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेतील दिली.
-----
राष्ट्रवादीकडून सदनिका विक्रीवर आक्षेप
पालिकेच्या मालकीच्या १ हजार २६० फ्लॅटची विक्री करण्याच्या निर्णयाबाबत विरोधी पक्षांच्या सदस्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर केल्याचा आरोप माजी महापौर आणि नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केला. राज्य सरकारने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. भाडेकरूंना स्वत:च्या मालकीची घरे मिळण्याला विरोध नाही. परंतु, या प्रस्तावावर सखोल चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे जगताप म्हणाले.