स्टेशन मास्टर्सना ‘फ्रंटलाईन वर्कर’ घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:13+5:302021-06-04T04:09:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन (एस्मा)च्या वतीने स्टेशन मास्टर्सना फ्रंटलाईन वर्कर घोषित करा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन (एस्मा)च्या वतीने स्टेशन मास्टर्सना फ्रंटलाईन वर्कर घोषित करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे निवदेनाद्वारे करण्यात आली.
कोरोनाच्या काळात देशातील ३७ हजार स्टेशन मास्टर्स आपला जीव धोक्यात घालून २४ तास रेल्वेच्या माध्यमातून देशाची सेवा करीत आहे. आतापर्यंत जवळपास १६०
स्टेशन मास्टर्सचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे असो की अन्न-धान्याची झालेली वाहतूक असो यात स्टेशन मास्टर्सने आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कुटुंबीयांचा विचार न करता सर्वांत जास्त प्राधान्य सेवेला दिले आहे. तेव्हा सरकारने आमच्या मागणीचा विचार करता आम्हाला फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करावे हीच अपेक्षा आहे. यावेळी विभागीय कार्यकारी अध्यक्ष अजय सिन्हा, सचिव एस. के. मिश्रा, अध्यक्ष गंगाधर साहू, मंडल सचिव कृष्ण मुरारी उपस्थित होते.