जिल्ह्याच्या बालमृत्यू दरात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:26+5:302021-07-11T04:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत नव्या लसी बालकांना गेल्या पाच वर्षांपासून दिल्या जात असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सार्वत्रीक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत नव्या लसी बालकांना गेल्या पाच वर्षांपासून दिल्या जात असल्याने त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ झाल्याने जिल्ह्यातील बाल मृत्यूच्या प्रमाणात माेठी घट झाली आहे. गेल्या पाच वर्षात बालमृत्यू दर हा ३८८ वरून २३२ पर्यंत खाली आला आहे. तर पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर हा ४८० वरून २८२ वर आला आहे. जिल्ह्यात दरवर्षी जवळपास ६० हजार बालकांचा जन्म होतो, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन येडके यांनी दिली.
लहान बालकांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विविध रोगांवरील लसींचे लसीकरण करण्यात येते. गोवर, रूबेला, रोटाव्हायरस, हेपॅटायपीस बी या सारख्या आजारांचा बालकांना धोका असतो. या आजारांपासून त्यांना वाचवण्यासाठी तसेच त्यांच्या प्रतिकार क्षमतेत वाढ करण्यासाठी साधारण पाच वर्षांपर्यंत विविध लसी दिल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत या साठी विषेश लसीकरण मोहिम राबविण्यात येते. या लसीकरणामुळेच जिल्ह्यातील बालमृत्यूदर हा कमी झाला आहे.
२०१४-१५ मध्ये जवळपास ६४ हजार ५६२ बालकांचा जिल्ह्यात जन्म झाला. या पेकी १ वर्षांखालील ३८८ बालकांचा मृत्यू झाला. तर पाच वर्षांखालील ४८० बालकांचा मृत्यू या वर्षात झाला होता. २०१६-१७ मध्ये ६९ हजार ३३६ बालकांचा जन्म झाला. या पेकी एक वर्षांखालील ३६७ बालकांचा मृत्यू झाला तर पाच वर्षांकालील ४५० बालकांचा मृत्यू झाला. २०१७-१८ मध्ये ५२ हजार ८२८ मुलांचा जन्म झाला. त्यातील एका महिन्यांच्या आतील २५३ बालकांचा मृत्यू झाला. तर पाच वर्षांखालील ३१७ बालकांचा मृत्यू झाला. तर २०१८-१९ मध्ये ५७ हजार ८५५ मुलांचा जन्म झाला. यातील एक वर्षांखालील २७० तर पाच वर्षांखालील ३३० बालकांचा मृत्यू झाला. २०१९-२० मध्ये ७७ हजार ५०९ बालकांचा जन्म झाला. त्यातील पहिल्या वर्षाखालील २३२ तर पाच वर्षांखालील २८२ मुलांचा मृत्यूदर कमी झाला. ही पाच वर्षांची आकडेवारी पाहता बालमृत्यूदरात सातत्याने घट झाली आहे.
लहाण मुलांचे कोररोबना लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या रोगप्रतिकारकता वाढवण्यासाठी नियमीत लसीकरणावर सध्या आरोग्य विभागाने भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांत एक वर्षापेक्षा कमी वयाच्या आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमधील मृत्यूंचे प्रमाण या लसीकरणामुळे कमी झाले आहे. ग्रामीण भागात आरोग्य विभागाने केलेलल्या उपाययोजनांमुळे ही सकारात्मक वाढ झाली आहे.
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके म्हणाले, “मागील पाच वर्षात आम्ही पेंटाव्हॅलेंट सादर केला आहे. यामुळे गोवर, रुबेला, रोटाव्हायरस, हिपॅटायटीस बी व इतर आजारांपासून बालकांचे संरक्षण होते. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत या लसी मुलांना दिल्या जातात. बहुतेक मृत्यू पाच वर्षांखालील आणि त्या वयोगटातही होतात. तर एक वर्षाखालील तसेच १ ते २८ दिवसांपेक्षा कमी वयाची मुले सर्वात असुरक्षित असतात. त्यांचे योग्य वेळी लसीकरण केल्यास त्यांचे संरक्षण होते.
चौकट
सोमवार पासूण न्युमोकोकल कँजुलेटचे मोफत लसीकरण
संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके अधिक बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर पुणे जिल्हा परिषद बालकांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकात एक वर्षाच्या आतिल बालाकांना न्युमोनिया रोखण्यासाठी वापरली जाणारी न्युमोकोकल कँजुलेट ही लस मोफत दिली जाणार आहे.
बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी न्युमोकोकल कँजुलेट ही लस दिली जाणार आहे. त्यात पहिला डोस वयाच्या सहाव्या आठवड्यात, दुसरा १४ आठवडे आणि तिसरा डोस नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर दिला जाणार आहे. या लसीच्या एका डोसची खासगीरूग्णालयात ही लस पाच हजार रुपयांना मिळते. ही लस जिल्हा परिषदेकडून मोफत दिली जाणार आहे.