भोर-वेल्हे तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:58+5:302021-05-29T04:08:58+5:30

भोर-वेल्हे तालुक्यात मार्च व एप्रिल महिन्यात १०० ते १५० पर्यंत दररोज रुग्णसंख्या जात होती. मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे ...

Decline in the number of corona patients in Bhor-Velhe taluka | भोर-वेल्हे तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत घट

भोर-वेल्हे तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत घट

Next

भोर-वेल्हे तालुक्यात मार्च व एप्रिल महिन्यात १०० ते १५० पर्यंत दररोज रुग्णसंख्या जात होती. मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात होत्या. त्यामुळे कोरोना हाॅटस्पाॅट असलेल्या गावात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून अधिक लक्ष दिले. गावातील लोकांच्या चाचण्या करून घेतल्या. आजारी लोकांच्या तपासण्या करून उपचार केले. मागील महिनाभरात सुपर स्प्रेडर रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले. भोर शहर लाॅकडाऊन करून कडक निर्बंध लावण्यात आले होते. आमदार संग्राम थोपटे यांनी दोन्ही तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा सेवाभावी संस्था यांच्यात समन्वय ठेवून काम केले यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

भोर तालुक्यात एकूण ५५५३ कोरोनाग्रस्त रुग्ण होते पैकी ५०८६ रुग्णांवर उपचार करून घरी सोडले आहे. तर ३१४ जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ११३ जणांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूदर २% तर रिकव्हरी दर ९२.९% आहे. वेल्हे तालुक्यात ५३९ रुग्ण असून १४०८ उपचारानंतर घरी सोडले आहेत. तर १२१ रुग्ण उपचार घेत आहे.

भोर तालुक्यात ससेवाडी व उपजिल्हा रुग्णालय येथे दोन कोविड हेल्थ केअर सेंटर तर भोर शहरात दोन कोविड केअर सेंटर असून खासगी दवाखान्यात शहरात दोन तर बाहेर तीन अशी पाच कोविड हेल्थ केअर सेंटर आहेत. १५० आॅक्सिजन असलेले बेड असून ३० व्हेंटिलेटर आहेत. वेल्हे तालुक्यात तीन कोविड केअर सेटर असुन २८ आॅक्सिजन बेड तर २ व्हेंटिलेटर आहेत. यामुळे वेळेत आॅक्सिजन पुरवठा व उपचार केल्यामुळे मागील मार्च आणि एप्रिल महिन्यात दररोज १०० ते १५० पर्यंत वाढलेली रुग्ण संख्या मे महिनात ५० ते २२ पर्यंत कमी झाली आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेले काटेकोर नियोजन आणी लोकांनी दिलेली साथ यामुळे ते शक्य होत आहे.

भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव दोन्ही तालुक्यातील तहसीलदार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस यंत्रणा, सेवाभावी संख्या आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णय याची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे आणी लोकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे येथील कोरोनाची परिस्थिती अाटोक्यात ठेवण्यात यश आले आहे.

संग्राम थोपटे (आमदार, भोर विधानसभा)

Web Title: Decline in the number of corona patients in Bhor-Velhe taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.