आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:29+5:302021-03-22T04:10:29+5:30
डिंभे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून तसेच घोडनदी,मीना नदीतून पाणी तालुक्याला मिळते. उसाच्या उत्पन्नाबरोबरच जनावरांना चाराही ऊस शेतीतून ...
डिंभे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून तसेच घोडनदी,मीना नदीतून पाणी तालुक्याला मिळते. उसाच्या उत्पन्नाबरोबरच जनावरांना चाराही ऊस शेतीतून मिळतो.
म्हैस, गाईपालनाचा व्यवसाय वाढला. दुग्ध व्यवसायातून बऱ्यापैकी फायदा होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून चक्रीवादळ अवकाळी, पाऊस, हुमणी विविध रोग यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्याचे चित्र आहे. या वर्षी तर उसाचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. एकरी १०० ते १३० टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेणारे शेतकरी तालुक्यात आहे. मात्र या वर्षी पावसामुळे व खराब हवामानामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. काही अपवाद वगळता एकरी ३५-४० टनांपर्यंत उसाचे उत्पादन निघालेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
खते, कीटकनाशक, मशागत, पाणी, मजुरीवर मोठा खर्च होत आहे. खराब हवामानाबरोबरच कारखान्यांकडून उसाची वेळेत तोडणी न झाल्याने उसाला तुरे येऊन वजनात घट येत आहे. चौदा ते अठरा महिन्यांनंतर उसाची तोडणी होत आहे. त्यामुळे उसाचे नुकसान होत आहे.
निरगुडसर येथील खोडवा उसाची झालेली अवस्था.