फळभाज्यांची आवक घटल्याने भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:13 AM2021-09-06T04:13:04+5:302021-09-06T04:13:04+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटल्याने भावात किंचित ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटल्याने भावात किंचित घसरण झाली. तळेगाव बटाट्याची आवक कमी होऊनही भाव स्थिर राहिले. जळगाव भुईमूग शेंगाची आवक कमी होऊनही भाव स्थिर राहिले, तर लसणाची आवक किंचित घटूनही भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची आवक कमी झाली तर टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, वांगी, भेंडी, कारली, ढोबळी मिरची, गवार, दुधी भोपळा, काकडी या फळभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू भाजीची आवक कमी झाली. जनावरांच्या बाजारात बैल, जर्शी गाय, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल २ कोटी ५० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ९०० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत १०० क्विंटलने वाढल्याने भावात ५० रुपयांची घसरण झाल्याने कांद्याला १६५० रुपयांवरून १६०० रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १००० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक १०० क्विंटलने घटूनही बटाट्याचा बाजारभाव १,३०० रुपयांवर स्थिर राहिले. जळगाव भुईमूग शेंगांची २ क्विंटल आवक होऊन ६,००० क्विंटल बाजारभाव मिळाला. लसणाची एकूण आवक १८ क्विंटल होऊनही लसणाला ८,००० रुपये बाजारभाव मिळाला.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक २५९ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला १,५०० ते २,५०० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे:
कांदा - एकूण आवक - ९०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,६०० रुपये, भाव क्रमांक २. १,३०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - १००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,३०० रुपये, भाव क्रमांक २. १,१०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे-
टोमॅटो - १७० पेट्या ( ४०० ते ८०० रू. ), कोबी - १३२ पोती ( ४०० ते ६०० रू. ), फ्लॉवर - ११६ पोती ( १,००० ते १,५०० रू.),वांगी - ६५ पोती ( १,००० ते २,००० रू.), भेंडी - ५६ पोती ( १,००० ते २,००० रू.),दोडका - ५२ पोती ( ५०० ते १,५०० रू.), कारली - ६३ डाग ( ५०० ते १,५०० रू.), दुधीभोपळा - ५७ पोती ( ५०० ते १,५०० रू.),काकडी - ५३ पोती ( ५०० ते १,५०० रू.), फरशी - ४९ पोती ( १,००० ते २,००० रू.), वालवड - ३८ पोती ( १,५०० ते २,५०० रू.), गवार - ६२ पोती ( १,५०० ते २,५०० रू.), ढोबळी मिरची - ६३ डाग ( १,००० ते १,५०० रू.), चवळी - २९ पोती ( १,००० ते २,००० रू. ), वाटाणा - १०० पोती ( ५,००० ते ७,००० रू. ), शेवगा - २० पोती ( २,००० ते ३,००० रू. ), गाजर - ४० पोती ( १,००० ते २,००० रू.).
पालेभाज्या –
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ६५ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ५०० ते १२०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची ५५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना ४०१ ते १,२५१ रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची ९ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १०१ ते ६०१ रुपये भाव मिळाला.पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रति शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी - एकूण २३ हजार ५४० जुड्या ( ८०० ते १,२०० रू. ), कोथिंबीर - एकूण ३१ हजार ६६० जुड्या ( ५०० ते १,००० रू.), शेपू - एकुण ३ हजार २६० जुड्या ( ५०० ते ८०० रू.), पालक - एकूण ३ हजार ५४० जुड्या ( ५०० ते ७००रू. ).
जनावरे -
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७५ जर्शी गाईंपैकी ५३ गाईंची विक्री झाली. ( १०,००० ते ५०,००० रू.),१३५ बैलांपैकी ११० बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३०,००० रू. ), १५५ म्हशींपैकी १२५ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ६०,००० रू. ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६४१० शेळ्या - मेंढ्यापैकी ५८२० मेंढ्यांची विक्री झाली.(२,००० ते १५,००० )
०५चाकण
चाकण बाजारात कोथिंबीरची मोठी आवक झाली.
050921\1433-img-20210905-wa0007.jpg
फोटो - चाकण बाजारात कोथिंबीरची मोठी आवक झाली.