आवक घटल्याने पालेभाज्याचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:06 AM2020-12-28T04:06:50+5:302020-12-28T04:06:50+5:30

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात वाढ झाली.तळेगाव ...

Declining income pushed up the prices of leafy vegetables | आवक घटल्याने पालेभाज्याचे भाव वधारले

आवक घटल्याने पालेभाज्याचे भाव वधारले

Next

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात वाढ झाली.तळेगाव बटाट्याची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली. भुईमूग शेंगांची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले,लसूणाची आवक वाढून भाव स्थिर राहिले. वाटाण्याची प्रचंड आवक झाल्याने बाजारभाव कोसळले़ कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा व दोडक्याच्या आवक वाढूनही बाजारभावात वाढ झाली.पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर,शेपू भाजीची आवक कमी झाल्याने भाव वधारले.जनावरांच्या बाजारात जर्शी गायच्या संख्येत घट झाली तर म्हैस,बैल शेळ्यांमेंढयांच्या संख्येत वाढ झाली.एकूण उलाढाल ३ कोटी ३० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २२५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३२५० क्विंटलने घटल्याने कांद्याचे भावात मोठी वाढ झाली. कांद्याच्या भावात तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवरून ३,००० हजार रुपयांवर पोहचला.तळेगाव बटाट्याची एकूण आवक १,२०० क्विंटल झाली.गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढल्याने बटाट्याच्या भावात ३०० रुपयांची घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवरून २,२०० हजार रुपयांवर आला.लसणाची एकूण आवक ११ क्विंटल झाली.मागील आठवड्याच्या तुनलेत १ क्विंटलने कमी होऊनही बाजारभावात ९,००० रुपयांवर स्थिरावले.भुईमुग शेंगांची ६ क्विंटल आवक झाली. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १९३ क्विंटल झाली.हिरव्या मिरचीला ३,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे: कांदा - एकूण आवक - २२५९ क्विंटल. भाव क्रमांक १. ३,००० रुपये, भाव क्रमांक २. २,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,५०० रुपये.

बटाटा - एकूण आवक - १२०० क्विंटल. भाव क्रमांक १. २,२०० रुपये, भाव क्रमांक २. १,७५० रुपये, भाव क्रमांक ३. १,५०० रुपये.

फळभाज्या

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - ४८ पेट्या ( १,५०० ते २,५०० रू. ), कोबी - १०८ पोती ( २०० ते ५०० रू. ), फ्लॉवर - १२३ पोती ( ५०० ते ९०० रु.),वांगी - १८ पोती ( २,००० ते ४,००० रु.). भेंडी - २२ पोती ( २,००० ते ४,००० रु.),दोडका - १९ पोती ( २,००० ते ३,००० रु.). कारली - २० डाग ( २,५०० ते ३,५०० रु.). दुधीभोपळा - २२ पोती ( १,००० ते २,००० रु.),काकडी - २३ पोती ( २,००० ते ३,००० रु.). फरशी - ८ पोती ( ३,००० ते ४,००० रु.). वालवड - १७ पोती ( ३,०० ते ४,००० रु.). गवार - १२ पोती ( ४,००० ते ५,००० रू.), ढोबळी मिरची - १८ डाग ( १,५०० ते २,००० रु.). चवळी - ५ पोती ( १,५००) ते २,५०० रुपये ), वाटाणा - ५२५ पोती ( १,८०० ते २,२०० रुपये ), शेवगा - ६ पोती ( ५,००० ते ७,००० रुपये ), गाजर - ५५ पोती ( १,००० ते २,००० रु.).

पालेभाज्या

राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ९७ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ३०० ते १,४०० रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची १ लाख ४५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना २०० ते ११०० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची एकूण आवक ४५ हजार जुड्या झाली असून, या जुड्यांना २०० ते ५०० रुपये असा भाव मिळाला.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

मेथी - एकूण १७ हजार ५४० जुड्या ( ८०० ते १,२० रुपये ), कोथिंबीर - एकूण २१ हजार ९५० जुड्या ( ३०० ते ६०० रुपये ), शेपू - एकुण ४ हजार ५१० जुड्या ( ३०० ते ६०० रुपये ), पालक - एकूण ३ हजार ९७० जुड्या ( ३०० ते ५०० रुपये ).

जनावरे

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६५ जर्शी गायींपैकी ३७ गाईची विक्री झाली. ( १०,००० ते ४८,००० रुपये ), १३५ बैलांपैकी ९५ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३५,००० रुपये ), २१२ म्हशींपैकी १६७ म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६५,००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८९२२ शेळ्या - मेंढ्यापैकी ८२३२ मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रुपये इतका भाव मिळाला.

२७ चाकण

चाकण बाजारात वांगी लिलाव सुरू.

Web Title: Declining income pushed up the prices of leafy vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.