दिघी परिसरात आढळला कुजलेला मृतदेह; आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:27 IST2023-09-13T14:21:29+5:302023-09-13T14:27:09+5:30
मृतदेह हा पुरुषांचा असून, त्याचे अंदाजे वय ३० वर्षे आहे...

दिघी परिसरात आढळला कुजलेला मृतदेह; आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय
पिंपरी :दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पठारे मळा येथे शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह हा पुरुषांचा असून, त्याचे अंदाजे वय ३० वर्षे आहे. या व्यक्तीचा मृत्यू आठ दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यतादेखील पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. पोलिस मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करत असून आसपासच्या लेबर कॅम्पमध्ये कोणी हरवले आहे का, याचीदेखील तपासणी करत आहेत.