मयुरेश्वरास आंब्याच्या फळांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:59+5:302021-05-18T04:09:59+5:30
राज्यातील सर्व धार्मिक स्थळ कोरोना या विषाणूजन्य आजाराचा वाढता फैलाव लक्षात घेता बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात ...
राज्यातील सर्व धार्मिक स्थळ कोरोना या विषाणूजन्य आजाराचा वाढता फैलाव लक्षात घेता बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील मयुरेश्वर मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद आहेत. मात्र परंपरेने चालत आलेल्या पूजाअर्चा व धार्मिक विधी संपन्न होत आहेत. पुणे येथील आश्विनी कदम यांनी श्रींस आंब्याची आरास करण्यासाठी ३० डझन आंबे दिले होते. दुपारी ३ वाजता पूजा करण्यात आली. येथील पुजारी संजय धारक, धनंजय धारक, अंकुश गुरव, गजानन धारक यांनी श्रींची पूजा करुन आंब्यांची सुंदर सजावट केली होती. मोरगाव येथील कोरोना विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांना आंबे देण्यात आले.
अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव येथील मयुरेश्वरास आंब्यांच्या फळांची सुंदर सजावट केली होती.
१७०५२०२१ बारामती—०७