धरणांच्या पातळीत होतेय घट, उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:20 AM2018-03-11T05:20:05+5:302018-03-11T05:20:05+5:30

जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासून केले, तरच जूनच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल; मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे महत्त्वाचे आहे.

Decrease in dam level, summer planning requirements | धरणांच्या पातळीत होतेय घट, उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता

धरणांच्या पातळीत होतेय घट, उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता

Next

शेटफळगढे - जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत पाणी सर्वांना जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासून केले, तरच जूनच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल; मात्र त्यासाठी प्रशासनासह नागरिकांची मानसिकता असणे महत्त्वाचे आहे.
पुणे हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात छोटी-मोठी तब्बल २५ धरणे आहेत. ग्रामीण भागातील जनतेला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती सर्वत्रच दिसते. जिल्ह्यात दोन-तीन वर्षांपासून जलसंधारण अभियान सुरू आहे. यात जलयुक्त शिवार, शेततळी निर्माण करण्यात
आली आहेत, तर बंधारे, नदी, कालवा, तलाव आदी ठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ काढणे, पाणी साठवणक्षमता वाढण्यासाठी दरवर्षी जोरदार उपक्रम राबविले जातात.
धरणातील पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यंदा होळीच्या आधीपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. पारा ३५ अंशांच्या वर चढल्याने गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकणार असल्याची चिन्हे गडद झाली आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होणार यात शंकाच नाही. खडकवासल्यावर पुणे शहर व ग्रामीण भागातील पाणी योजना आणि हजारो एकर शेती अवलंबून आहे.
उजनी धरण हे सोलापूर, पुणे, नगर या तिन्हींसाठी वरदान ठरले असल्यामुळे या धरणातील पाण्यावरून कायमच रणकंदन होत असते. यंदा हे धरण ओसंडून वाहिले. पुणे ग्रामीण भागातील शेतकºयांच्या हक्काच्या पाण्यावर सोलापूरकरांनी डल्ला मारल्याने अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हक्काचे पाणी सोलापूरला जाण्यापासून रोखले होते.

प्रमुख धरणांतील पाणीसाठा

पिंपळगाव जोगे : ४२.६४
माणिकडोह : ४७.७९
येडगाव : ५७.९४
डिंभे : ५६.२३
घोड : ४१.१५
कळमोडी : ९८.०७
चासकमान : ४८.६७
भामा-आसखेड : ७३.२०
पवना : ५५.०७
मुळशी : ४३.२३
टेमघर : ०.०
पानशेत : ६६.१४
खडकवासला : ८१.४३
गुंजवणी : ३८.८६
नीरा-देवघर : ५१.७९
भाटघर : ६९.५६
वीर : ६०.४२
नाझरे : ३५.०२
उजनी : ७३.१९

1 खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेल्या इंदापूर दौंड हवेलीसह बारामतीच्या काही गावची शेती गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आली आहे. यंदा तरी शेतीला पाणी येईल, या आशेवर या तालुक्यातील शेतकरी आहेत.

2मात्र उन्हाळ्यात शेतीला पाणी किती देणार, हे सध्या तरी अस्पष्ट आहे. पण, पाणी सोडताना ते किती प्रमाणात आणि किती सोडले पाहिजे, याचे नियोजन हवे. पाऊस यंदा होऊनदेखील शेतीला पाणी नाही, अशी वेळ शेतकºयांवर येऊ नये. यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Decrease in dam level, summer planning requirements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.