ओतूर परिसरात रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:05+5:302021-06-10T04:09:05+5:30
ओतूर प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र कक्षेतील १७ गावांना दिलासा मिळाला आहे, परंतु बुधवारी ओतूर शहरात २ व उदापूर गावात ...
ओतूर प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र कक्षेतील १७ गावांना दिलासा मिळाला आहे, परंतु बुधवारी ओतूर शहरात २ व उदापूर गावात १ नवीन रुग्ण सापडले, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते म्हणाले.
ओतूर परिसरात बुधवारी ३ रुग्ण सापडल्याने परिसराची बाधितांची संख्या २ हजार ३५१ झाली आहे. पैकी २ हजार १५९ बरे झाले आहेत. ७४ जण कोविड सेंटर २२ जण घरीच उपचार घेत आहेत. ९६ ,जणांचा मृत्यू झाला आहे .
ओतूर शहरातील बाधितांची संख्या १ हजार ३३ झाली आहे.९४८ बरे झाले आहेत .३० जण कोविड सेंटर १८ जण घरातच उपचार घेत आहेत.३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
उदापूर येथील बाधितांची संख्या १९३ झाली आहे. त्यातील १८० बरे झाले आहेत. ६ जण उपचार घेत आहेत .७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. सारोक्ते यांनी सांगितले.