बटाटा उत्पादनात घट
By admin | Published: October 15, 2014 05:22 AM2014-10-15T05:22:54+5:302014-10-15T05:22:54+5:30
अतिउष्णता व पावसाने दिलेला ताण यामुळे बटाटा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. काढलेल्या बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सडण्याचे प्रमाण वाढले आहे.
पेठ : अतिउष्णता व पावसाने दिलेला ताण यामुळे बटाटा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. काढलेल्या बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सडण्याचे प्रमाण वाढले आहे.
सातगाव पठार परिसरात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विविध जातीचे बटाटे यामधून दर वर्षी या भागातील शेतकरी पीक घेत असतात. चालू वर्षी पाऊस उशिरा झाला. त्यामुळे बटाटा पीक काढणीस उशीर झाला. एकरी ५० ते ५५ हजार रुपये खर्च बियाणे खरेदी, लागवड, औषध फवारणी, खुरपणी, मजुरी व बटाटा काढणे यासाठी खर्च होतो.
बटाटा पिकाचे गळीत निम्म्याने घटले आहे. बाजारभाव चांगला आहे. मात्र, उत्पादित बटाट्यामध्ये सडण्याचे प्रमाण जास्त आहे. यापूर्वी ५० किलो वजनाच्या बियाण्यापासून ४ ते ५ पिशव्या प्रतिपिशवी ६० किलो याप्रमाणे निघत होते. चालू वर्षी कमी उत्पादन असल्याने शेतकरीवर्गाचे वर्षाचे आर्थिक बजेट कोलमडेल, असे शेतकरी संतोष बाबाजी धुमाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)