नीरा नदीच्या पाणीपातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:01+5:302021-03-30T04:08:01+5:30
इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी तर माळशिरस तालुक्यातील बांगार्डे, पळसमंडळ या परीसरातील बहुतांश शेतकरी हा नीरा नदीच्या पाणीस्त्रोतावरती ...
इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी तर माळशिरस तालुक्यातील बांगार्डे, पळसमंडळ या परीसरातील बहुतांश शेतकरी हा नीरा नदीच्या पाणीस्त्रोतावरती अवलंबून आहे. गेल्यावर्षी मुबलक प्रमाणात झालेल्या पावसामुळे या वर्षी नदी पात्रातील जलसाठा तुलनेत जास्त दिवस टिकला असला तरी सध्या या परीसरातील नदीमधील जलसाठा पूर्णपणे कमी झाल्याने शेतातील ऊस पिकासह फळबागा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. अगोदरच विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे नदीपात्रातील जलसाठा ही दिवसेंदिवस कमी होत संपुष्टात आला असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे नीरा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
सध्या नीरा नदीपात्रातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने पुढील काही दिवसात नदीमधील पाणी पूर्णपणे संपेल अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढील काळात शेतीबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. त्यामुळे सध्या नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे.
- भगवानराव रणसिंग
शेतकरी निमसाखर
निमसाखर-बांगार्डे परिसरातील नीरा नदी पात्रातील संपुष्टात आलेला जलसाठा.
२९०३२०२१-बारामती-१४
-------------------------