खेड तालुक्यातील पश्चिम भागात पाणीपातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:52+5:302021-03-17T04:11:52+5:30
पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. परंतु सर्व पाणी वाहून जाते. उन्हाच्या तीव्र झळामुळे पाण्याचे स्रोत कोरडे पडताना ...
पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. परंतु सर्व पाणी वाहून जाते. उन्हाच्या तीव्र झळामुळे पाण्याचे स्रोत कोरडे पडताना दिसत आहेत.
महिलांना दूरवरून हातपंपाच्या सहाय्याने पाणी हापसावे लागते. काही ठिकाणी विहिरीतून पाणी काढावे लागते. दिवसभर पाण्यासाठी दाहीदिशा शोधाव्या लागतात. नायफडच्या वाडया वस्त्या, बांगरवाडी, वरचे भोमाळे, कारकुडी इत्यादी भागात पाण्याची समस्या अधिक गंभीर असते. पाण्याचे टँकर उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
पाण्याच्या शोधात वन्यप्राणी रस्त्यावर तसेच वस्त्यांमध्ये येत असल्याचे दृष्टीस पडते. त्यात रस्ता ओलांडताना अनेक प्राण्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. केवळ पाण्याअभावी वन्यप्राणी स्थलांतर करू लागले आहेत. जनावरांसाठी, कपडे धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी पाण्याची नितांत गरज असते.महिला पाण्याचे दोन ते तीन हांडे डोक्यावर घेऊन पायी चालत असतात. दारिद्रय़ रेषेखालील व्यक्तींना घरकुल योजना मिळाली आहे परंतु पाण्या अभावी बांधकाम करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.