बटाट्याची आवक वाढल्याने भावात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:48+5:302021-08-23T04:12:48+5:30
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटल्याने भावात घसरण ...
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमधील उपबाजारात कांद्याची आवक घटल्याने भावात घसरण झाली. तळेगाव बटाट्याची आवक वाढल्याने भावात घट झाली. भुईमूग शेंगाची काहीही आवक झाली नाही, तर लसणाची आवक किंचित घटूनही भावही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीची वाढली तर टोमॅटो,फ्लॉवर,कोबी, वांगी,भेंडी,कारली,ढोबळी मिरची, गवार,दुधी भोपळा, काकडी या फळभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी,कोथिंबीर व शेपू भाजीची प्रचंड आवक झाली.जनावरांच्या बाजारात बैल,जर्शी गाय,म्हैस व शेळ्यांमेंढ्यांच्या संख्येत घट झाली.एकूण उलाढाल २ कोटी ५ लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ८०० क्विंटल झाली. मागील शनिवारच्या तुलनेत २०० क्विंटलने घटल्याने भावात ५० रुपयांची घसरण झाल्याने कांद्याला १८५० रुपये असा भाव मिळाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक १५० क्विंटलने वाढूनही बटाट्याचा बाजारभाव १ हजार ३०० रुपयांवर आला. लसणाची एकूण आवक १८ क्विंटल होऊनही लसणाला ८ हजार रुपये बाजारभाव मिळाला.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १५८ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला १,००० ते ३,००० रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव:
कांदा - एकूण आवक - ८०० क्विंटल. भाव क्रमांक १. १,८५० रुपये, भाव क्रमांक २. १,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये. बटाटा - एकूण आवक - १,२५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,३०० रुपये, भाव क्रमांक २. १,१०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.
फळभाज्या
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव:
टोमॅटो - १९१ पेट्या ( ३०० ते ६०० रू. ), कोबी - ११८ पोती ( २०० ते ६०० रू. ), फ्लॉवर - १५८ पोती ( ४०० ते ८०० रू.),वांगी - ९९ पोती ( १,००० ते २,००० रू.). भेंडी - ६५ पोती ( ५०० ते १,५०० रू.),दोडका - ८५ पोती ( ५०० ते १,००० रू.). कारली - १२८ डाग ( ५०० ते १,५०० रू.). दुधीभोपळा - २५ पोती ( ५०० ते १,५०० रू.),काकडी - ८५ पोती ( ५०० ते १,५०० रू.). फरशी - ७९ पोती ( ५०० ते १,५०० रू.). वालवड - ४३ पोती ( १,००० ते ३,००० रू.). गवार - ४४ पोती ( १,००० ते २,००० रू.). ढोबळी मिरची - ७० डाग ( ५०० ते १,५०० रू.). चवळी - २० पोती ( ५००) ते १,५०० रू. ), वाटाणा - १०८ पोती ( २,००० ते ४,००० रू. ), शेवगा - ७ पोती ( २,००० ते ४,००० रू. ), गाजर - ३२ पोती ( १,००० ते २,००० रू.).
पालेभाज्या:
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ४२ हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ४०० ते १५०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची ५५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना २०१ ते १,००० रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची १८ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १५१ ते ७०० रुपये भाव मिळाला. पालकची काहीही आवक झाली नाही.
चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव:
मेथी - एकूण २९ हजार ६०० जुड्या ( ५०० ते १,००० रू.). कोथिंबीर - एकूण ३५ हजार ४०० जुड्या ( १०० ते ४०० रू. ), शेपू - एकुण १० हजार ३०० जुड्या ( १०० ते ३०० रू. ), पालक - एकूण ३ हजार २०० जुड्या ( ३०० ते ५०० रू.).
जनावरे:
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४४ जर्शी गाईंपैकी ३० गाईंची विक्री झाली. ( १०,००० ते ५०,००० रू. ), ८७ बैलांपैकी ५७ बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३०,००० रू. ), ९७ म्हशींपैकी ७८ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ६०,००० रू. ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४४३० शेळ्या - मेंढ्यांपैकी ३३५० मेंढ्यांची विक्री झाली.(२,००० ते १५,००० रू.)
२२ चाकण
220821\img-20210817-wa0018.jpg
चाकण बाजारात कोथिंबीरची प्रचंड आवक झाली होती