समर्पित राष्ट्रभाषा प्रचारक : प्रा. सु. मो. शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:50+5:302021-03-21T04:11:50+5:30
ते अनेक पुस्तकांचे लेखक, संपादक व 'ज्ञानदा' साहित्यिक मंचाचे संचालक होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन केले होते. अखिल ...
ते अनेक पुस्तकांचे लेखक, संपादक व 'ज्ञानदा' साहित्यिक मंचाचे संचालक होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन केले होते. अखिल भारतीय हिंदी संस्था संघ, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी व अनेक राज्यांच्या स्वैच्छिक हिंदी संस्था बरोबर संयुक्तपणे त्यांनी नवलेखक शिबीर, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एकांकी नाट्य लेखन-वाचन-मंचन, कविसम्मेलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे संचालन व मार्गदर्शन केले.
प्रा.शहा सरांना अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गंगाशरणसिंह हिंदी प्रचार पुरस्कार, राष्ट्रभाषा रत्न हिंदी साहित्य सम्मेलन प्रयाग, राष्ट्रीय हिंदी सेवा सम्मान, हिंदी अकादमी कोलकाता, 'हिंदी शिरोमणी', हिंदी प्रचार समिति, जहिराबाद दक्षिण भारत, अतिविशिष्ट हिंदी सेवी सम्मान-मैसूर हिंदी परिषद व कर्नाटक साहित्य अकादमी अशा नानाविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
- डॉ .वीणा मनचंदा, कार्याध्यक्षा, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा परिवार