आळंदीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:14+5:302021-08-27T04:15:14+5:30
या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुरेश ...
या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सचिव अजित वडगावकर, राजाभाऊ चोपदार, उत्तम गोगावले, दिलीप खळदकर, भारत सैनिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप भोसले, श्रीधर सरनाईक, आनंदराव मुंगसे, तुकाराम गवारी, प्राचार्य दीपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, रघुनाथ सावंत उपस्थित होते.
प्रकाश काळे म्हणाले, बदलत्या गतिमान जीवनशैलीत लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी आईवडिलांविषयी कृतज्ञता सोहळे आवश्यक आहेत.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षिका कुसुम पाटील यांचा कांताबाई वडगावकर यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता फिरके यांनी केले. सूत्रसंचालन एस. जी. मुंगसे यांनी केले, तर डॉ. दीपक पाटील यांनी आभार मानले.