अवसरीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:35+5:302021-05-01T04:09:35+5:30
केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी रुग्णवाहिकेचे पूजन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात यांच्या हस्ते करण्यात ...
केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी रुग्णवाहिकेचे पूजन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर यांनी दिली.
या वेळी सरपंच जगदीश अभंग, उपसरपंच स्नेहा टेमकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राजू भोर, कल्याण टेमकर, माजी उपसरपंच दिनेश खेडकर, अनिल शिंदे, माजी सभापती आनंदराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कमलेश शिंदे, वैभव वायाळ, सचिन ढोणे, सुवर्णा क्षीरसागर, ऊर्मिला तांबे, ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
अवसरी खुर्द येथील रुग्णांना अनेकदा मंचर ग्रामीण रुग्णालयात किंवा पुण्यातील दवाखान्यात उपचारासाठी जाण्याची गरज पडते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अवसरी येथे नवीन आरोग्य केंद्रासाठी २ कोटी ७४ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे प्रशस्त आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली आहे. तसेच अवसरी येथील कोविड सेंटरमध्ये सध्या १२०० ते १३०० रुग्ण उपचार घेत आहेत. येथील रुग्णांना व स्थानिक रुग्णांना ने-आण करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने अवसरी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली. फोटो : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
३० अवसरी
रुग्णवाहिकेच्या पूजनप्रसंगी अरुणा थोरात, संतोष भोर, जगदीश अभंग व इतर.