अमोल बालवडकर क्वीक रिस्पॉन्स टीम'चे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:26 AM2021-02-20T04:26:31+5:302021-02-20T04:26:31+5:30

बाणेर-बालेवाडी प्रभागाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून चार वर्षे प्रभागात केलेल्या विकासकामाच्या चित्रफितीचे लोकार्पण केले. 'अमोल बालवडकर ...

Dedication of Amol Balwadkar Quick Response Team | अमोल बालवडकर क्वीक रिस्पॉन्स टीम'चे लोकार्पण

अमोल बालवडकर क्वीक रिस्पॉन्स टीम'चे लोकार्पण

Next

बाणेर-बालेवाडी प्रभागाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून चार वर्षे प्रभागात केलेल्या विकासकामाच्या चित्रफितीचे लोकार्पण केले.

'अमोल बालवडकर क्वीक रिस्पॉन्स टीम' या संकल्पनेतून अमोल बालवडकर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करणार आहेत. यावर पुणे शहर भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत 'स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक' असल्याचे बोलून दाखवले. तसेच भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी 'क्वीक नगरसेवकाने आता लोकांच्या तत्काळ मदतीसाठी क्वीक रिस्पॉन्स टीम स्थापन केल्याबद्दल स्तुती केली'.

भाजप कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनित जोशी यांनी बोलताना भाजप पक्षाचं संघटन बाणेर-बालेवाडी प्रभागात मजबूत करण्यात अमोल बालवडकर यांचं मोलाचं योगदान असल्याचे बोलून दाखवले. प्रभागात २४/७ पाणी पुरवठा करण्यासाठी केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडला.

यावेळी कार्यक्रमात अनेकांनी अमोल बालवडकर यांना जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यामध्ये राजकीय नेते, आजी-माजी आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यासह प्रभागातील नागरिकांचा समावेश होता. तसेच कार्यक्रमाप्रसंगी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, पुनितजी जोशी, नगरसेवक किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, प्रकाश बालवडकर, नगरसेवक राजाभाऊ बराटे, उमेश गायकवाड,सुनीता वाडेकर, राघवेंद्र मानकर, नितीन काळजे, मयूर भांडे,गणेश जांभुळकर, सुनील माने, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, बाळा टेमकर, संदीप कस्पटे, लहू बालवडकर, प्रकाश किसन बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, कृष्णा बालवडकर, उमा गाडगीळ, शिवम बालवडकर, बबनराव चाकणकर, लक्ष्मणराव सायकर, जयदीप पवार, बालेवाडी विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्ट व औदुंबर ग्रुपचे सर्व सभासद, बालेवाडी अष्टविनायक मित्रमंडळ, श्रीशिवराज मित्र मंडळ, लक्ष्मीमाता मित्रमंडळचे सर्व सभासद, वसुंधरा अभियान बाणेर, बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशन व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Dedication of Amol Balwadkar Quick Response Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.