बोपगाव येथे ओढाजोड प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:26+5:302021-04-10T04:10:26+5:30
भारत फोर्ज लि.पुणे यांच्या आर्थिक सहाय्याने,जिल्हा परिषद पुणे व लोकसहभागातून करण्यात आलेल्या ३.७ किमी लांबीच्या कानिफनाथ पायथा सिंचन योजनेच्या ...
भारत फोर्ज लि.पुणे यांच्या आर्थिक सहाय्याने,जिल्हा परिषद पुणे व लोकसहभागातून करण्यात आलेल्या ३.७ किमी लांबीच्या कानिफनाथ पायथा सिंचन योजनेच्या कामाचा लोकार्पण सोहळा भारत फोर्ज कंपनीच्या सी एस आर प्रमुख लीना देशपांडे व जयदीप लाड यांच्या हस्ते झाला.
यावेळी उद्योजक विठ्ठल झेंडे ,जलतज्ञ सागरतात्या काळे,माजी सरपंच योगेश फडतरे , सरपंच सुषमा फडतरे ,ग्रा.प.सदस्या हर्षदा पवार,प्रियंका फडतरे ,संजीवनी फडतरे ,सुवर्णा जगदाळे ,स्वाती फडतरे ,ज्योती फडतरे,शंकर फडतरे , साहेबराव फडतरे ,अशोक फडतरे ज्ञानेश्वर फडतरे ,नंदकुमार फडतरे ,मधुकर जगदाळे आदीसह बोपगावकर उपस्थित होते.
या योजनेमुळे बोपगाव,चांबळी,व हिवरे परिसरातील गावांचा बारमाही महिने शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. परिणामी शेतकर्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच गावांचा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार असल्याचे माजी सरपंच योगेश फडतरे यांनी सांगितले.
०९ गराडे
बोपगाव येथे ओढाजोड प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित लीना देशपांडे,जयदिप लाड,विठ्ठल झेंडे ,सागर काळे,सुषमा फडतरे.