वैकुंठ गमनाच्या शिल्पाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:33+5:302021-07-30T04:11:33+5:30
या वेळी उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, माजी जि. प. सदस्य महादेव ...
या वेळी उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, माजी जि. प. सदस्य महादेव कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, हभप सुरेश कांचन, दीपक कांचन, विनोद कांचन, महादेव कांचन, हरिभाऊ डोलारे, घनश्याम जाधव, राजू खेडेकर उपस्थित होते.
उरुळी कांचन येथील दानशूर कुटुंब आबासाहेब पाटील, बुवा कांचन, उद्योजक संजय आबासाहेब कांचन व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांच्यावतीने उरुळी कांचन भजनी मंडळाच्या आग्रहास्तव सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून गावच्या स्मशानभूमी प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचे शिल्प साकारण्यात आले आहे.
संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमनाच्या अनुभूतीमधून प्रेरणा मिळावी हा उद्देश असल्याने हे शिल्प साकारण्यात आल्याची माहिती संतोष कांचन यांनी दिली. या शिल्पाची निर्मिती गणेश कुंभार यांनी केली आहे.
२९ उरुळी कांचन लोकार्पण