विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सेवा ॲप’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:39+5:302021-02-07T04:10:39+5:30

या वेळी पिंपरी चिंचव़ड पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवंदे, स्कूल ऑफ ...

Dedication of 'Seva App' created by students at the hands of Deputy Chief Minister | विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सेवा ॲप’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सेवा ॲप’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Next

या वेळी पिंपरी चिंचव़ड पोलीस आयुक्त श्री. कृष्ण प्रकाश, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवंदे, स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अधिष्ठाता डॉ. रजनिश कौर सचदेव, संगणक विभागाच्या डॉ. रीना पगारे, प्रा. सुरेश कापरे आणि विद्यार्थी अविराज सिंग आदी उपस्थित होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस विभागाच्या सुधारणेत आणि पोलिसांसंबधी अनेक प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञान विकासक म्हणून एमआयटी एडीटी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. ‘सेवा ॲप’ निर्मितीमध्ये पोलीस उपायुक्त सुरेश हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद यांचे मार्गदर्शन मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंग कम्प्युटर विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांच्यासाठी ‘सेवा ॲप’ तयार केले आहे. हे ॲप पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 15 पोलीस स्टेशनमध्ये वापरण्यात येणार आहे. स्मार्ट पोलीस प्रकल्पांतर्गत पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ॲपचा वापर केला जाणार आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एमआयटी एडीटी विद्यापीठाने ‘सेवा ॲप’ विनाशुल्क पोलीस विभागाला त्यांच्या गरजेनुसार बनवून दिले आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी याबद्दल प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यापुढेही असेच संशोधन आणि निर्मिती करिता प्रोत्साहित केले.

Web Title: Dedication of 'Seva App' created by students at the hands of Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.