स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहीद संभाजी राळे सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:19+5:302021-08-18T04:15:19+5:30

कुरकुंडी गावचे सुपुत्र शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे हे देशसेवेत असताना ६ जानेवारी २०२१ रोजी शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ ...

Dedication of Shaheed Sambhaji Rale Sanskritik Bhavan on the occasion of Independence Day | स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहीद संभाजी राळे सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहीद संभाजी राळे सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण

Next

कुरकुंडी गावचे सुपुत्र शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे हे देशसेवेत असताना ६ जानेवारी २०२१ रोजी शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक भवन उभारण्याची घोषणा शरद बुट्टे पाटील यांनी केली होती. त्यानुसार २१ लक्ष रुपये खर्च करून ४२०० स्क्वेअर फुटांचे सांस्कृतिक भवन बांधण्यात आले असून, या भवनाला शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे सांस्कृतिक भवन, असे नाव देण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण शहीद संभाजी राळे यांच्या मातोश्री अरुणाताई आणि वडील ज्ञानेश्वर राळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, अमोल पवार, शांताराम भोसले, कैलास गाळव, रमेश राळे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संतोष भोगाडे, विस्ताराधिकारी एसडी थोरात, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दीपक जंबुकर व बाळासाहेब वाघमारे, पदाधिकारी संजय रौंधळ, रोहित डावरे, दत्ता मांडेकर, सरपंच गौतम आवरी, मंगल भांगे, किरण पडवळ, यशवंत वाळुंज, महेंद्र कोळेकर, गणेश चौधरी, अर्जुन कडुसकर, संतोष कड, दिनेश लांडगे, निर्मला कोळेकर, वैशाली तांबे आदी पदाधिकारी यांसह कुरकुंडी गावचे सरपंच सागर जावळे, उपसरपंच रंजना भोकसे, ग्रामपंचायत सदस्य काळूराम राळे, मनीषा हबडे, नितीन भोंकसे, सारिका भोंकसे, सविता पडवळ, ग्रामसेविका सुनीता चौधरी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बुट्टे पाटील म्हणाले की आपण अनेक इमारती बांधल्या, परंतु संभाजी राळे सांस्कृतिक भवन हे सर्वात समाधान देणारे काम आहे. आज माजी सैनिकांनी केलेला सत्कार हा सर्वोच्च सन्मान आहे. आज देशसेवेसाठी सैन्यदलात देशप्रेमी तरुणांची गरज असून, नव्या पिढीने संभाजी राळे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सैन्यदलात दाखल व्हावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

या वेळी अतुल देशमुख, अमोल पवार, रमेश राळे, माजी सैनिक दत्तात्रेय टोपे यांची भाषणे झाली. या वेळी तालुक्‍यातील २५ माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सलोनी आवळे हिने संभाजी राळे यांच्या जीवनावर भाषण केले, तर कल्याणी भोकसे या विद्यार्थिनीने ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. बाळासाहेब घाटे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक भोकसे यांनी आभार मानले.

Web Title: Dedication of Shaheed Sambhaji Rale Sanskritik Bhavan on the occasion of Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.