गुरू गौतम मुनी चॅरिटेबल सेंटरमध्ये सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:35+5:302021-06-24T04:09:35+5:30
श्री गुरू गौतम मुनी मेडिकल अँड चॅरिटेबल सेंटर येथे सोनोग्राफी मशीनच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते या ...
श्री गुरू गौतम मुनी मेडिकल अँड चॅरिटेबल सेंटर येथे सोनोग्राफी मशीनच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते या मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
जून २०१४ मध्ये स्थापन झालेल्या या सेंटरमध्ये ८ डायलिसीस मशीन असून आतापर्यंत सुमारे ३५ हजार रुग्णांना येथे डायलिसीस करण्यात आले आहे. या ठिकाणी नाममात्र पैशामध्ये व ज्यांची परस्थिती नाही अशांना मोफत डायलिसीस केले जाते. यासोबतच डेंटल, एक्सरे,ई.सी.जी.,रक्त तपासणी व आता सोनाेग्राफी देखील अल्पदरात या ठिकाणी उपलब्ध झाली असून काही दिवसांतच या ठिकाणी सीटी स्कॅन मशीन देखील मानवसेवेसाठी येणार असल्याचे अध्यक्ष ललीत जैन यांनी सांगितले.
या वेळी नगरसेवक महेश वाबळे, हरीश परदेशी, संस्थेचे मार्गदर्शक सतीश बनवट, प्रफ्फुल कोठारी, मितेश कोठारी, भरत सुराणा, मनोज छाजेड, प्रकाश संचेती, दिनेश कर्णावट, जीवन बेद, महेंद्र व्यास, राहुल बोगावत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, गौतम गेलडा, संतोष भुरट, दिनेश मुनोत, मुकुल बरमेचा, वैभव सेठिया, नेमीचंद सोळंकी आदींनी केले.