पुण्यात ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची हाेतेय परवड..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:18 IST2025-04-09T09:11:15+5:302025-04-09T09:18:21+5:30
शहरासह जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालय किती, याचा वेध घेतला तर तब्बल ५७ धर्मादाय रुग्णालय असल्याचे दिसते.

पुण्यात ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची हाेतेय परवड..!
पुणे : धर्मादाय हॉस्पिटलच्या नावाखाली राज्य सरकारकडून सवलती घेऊनदेखील प्रत्यक्षात सामान्य रुग्णाला त्याचा काही फायदा होत नाही, असे विदारक चित्र तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर प्रकर्षाने समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालय किती, याचा वेध घेतला तर तब्बल ५७ धर्मादाय रुग्णालय असल्याचे दिसते. विशेष म्हणजे यात रुबी, जहांगीर, पूना हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांचाही यात समावेश असून, अनेकांना याची माहितीच नसल्याने रुग्णांशी संवाद साधल्यानंतर पुढे आले आहे. पुण्यात तब्बल ५७ धर्मादाय रुग्णालये, तरीही रुग्णांची परवड हाेतेच कशी, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.
शहरातील धर्मादाय रुग्णालयांची नावे माेठी :
रुबी हॉल क्लिनिक, जहांगीर हॉस्पिटल, एन. एम. वाडिया कार्डिओलॉजी हॉस्पिटल, एन. एम. वाडिया हॉस्पिटल, ईनलॅक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, माई मंगेशकर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, विश्वशांती धाम वाघोली, पूना हॉस्पिटल, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, लोकमान्य हॉस्पिटल निगडी, वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल, सुतिका सेवा मंदिर रुग्णालय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑथोमलॉजी, सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल, सुबुध हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, संजीवन हॉस्पिटल, कवडे नर्सिंग होम, साने गुरुजी आरोग्य केंद्र माळवाडी, विलू पूनावाला हॉस्पिटल, इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, धन्वंतरी हॉस्पिटल प्राधिकरण निगडी, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल हॉस्पिटल, तळेगाव जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाडे, सेवाधाम हॉस्पिटल तळेगाव दाभाडे, परमार हॉस्पिटल लोणावळा, गिरीराज हॉस्पिटल बारामती, कृष्णाबाई मेमोरियल हॉस्पिटल केडगाव, मोहन ठुसे आय हॉस्पिटल नारायणगाव, डॉ. जलमेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर नारायणगाव, मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल घोडनदी (शिरुर), श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, सिंहगड डेंटल कॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर, हरजीवन हॉस्पिटल, हार्डिकर हॉस्पिटल, साळी हॉस्पिटल मंचर, दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिंचवडगाव, मीरा हॉस्पिटल, मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र, एस हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, इंद्रायणी हॉस्पिटल ॲण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदी देवाची, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल मोशी प्राधिकरण, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, आयुर्वेद रुग्णालय स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्राधिकरण, निगडी, विश्वराज हॉस्पिटल लोणी.