भोरमध्ये तीव्र पाणीटंचाई

By admin | Published: May 12, 2014 03:35 AM2014-05-12T03:35:50+5:302014-05-12T03:35:50+5:30

भोर तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. त्यामुळे टॅँकरची संख्याही वाढतेय.

Deep water shortage in the morning | भोरमध्ये तीव्र पाणीटंचाई

भोरमध्ये तीव्र पाणीटंचाई

Next

भोर : भोर तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. त्यामुळे टॅँकरची संख्याही वाढतेय. तालुक्यातील नीरा देवघर, महुडे वेळवंड, भूतोडे खोर्‍यातील २१ वाड्यावस्त्या ९ गावांना ४ टँकर व ३ पिकअपद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नीरा देवघर व भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भविष्यात टँकरही वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील निवंगण, कळंबाचा माळ, पºहार बुद्रुक, धानवली, धनगरवस्ती, माझेरी, शिरवली हिमा, कुडली बु. चौधरीवस्ती, दुर्गाडी, अमेपुरी, मानटवस्ती यांना एका टँकरने. वरवंड, कारुंगण, सुईरमाळ, उबार्डे, उबार्डेवाडी, नेरडमाळ यांना एक टँकरने महुडे बुद्रुक, भानुसरा, आखाडे वस्ती, हरिजन वस्ती यांना एका टँकरने, ग्रहिणी, खुलशी, डेरे, भूतोडे यांना एका टँकरने; तर डुंबेवस्ती, जळकेवाडी, शिंदेवाडी, महादेववाडी, आंबेवाडी, सुतारवाडी, मिरकुटवाडी, धनगरवस्ती यांना तीन पिकअपद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शिरगाव, शिळीब येथील नळ पाणीपुरवठा विहिरींना पाणी कमी झाल्याने, तर कुंड, अशिंपी येथील शिवकालीन विहिरींना पाणी नसल्याने राजीवडीतही पाणीटंचाई सुरू झाली आहे. धारांबे येथील उताराची नळ पाणीटंचाई सुरू झाली आहे. धारांबे येथील उताराची नळ पाणीपुरवठा योजनेला पाणी कमी पडत असल्याने टँकरची मागणी केली आहे. जवळपास कुठेच पाणी नाही. नीरा देवघर धरणावरून ३ किलोमीटरवर पाणी आणावे लागत आहे. येथील आसालीक केंद्रावरही पाणी नसल्याने खासगी पिकअपद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दुर्गाडीची धरणातील नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. तर, शिवकालीन विहिरींना पाणीच नाही. टँकरशिवाय कोणताच पर्याय नाही. ३ किलोमीटरवर असणार्‍या नीरा देवघर धरणातही पाणीसाठा उपलब्ध नाही. (वार्ताहर)

Web Title: Deep water shortage in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.