दीपक बुंदेले यांची ‘वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:44+5:302021-05-03T04:06:44+5:30
पुणे : गेल्या चौदा वर्षात अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू, गायक, संगीतकार यांसह राजकारण व समाजकारण क्षेत्रातील जवळपास १५०० ...
पुणे : गेल्या चौदा वर्षात अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू, गायक, संगीतकार यांसह राजकारण व समाजकारण क्षेत्रातील जवळपास १५०० व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यासमवेत छायाचित्राचा ८५०० फोटोचा संग्रह केल्याने दीपक बुंदेले यांची ओ.एम. जी. वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. त्यांना ओ. एम. जी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह (मेडल) देऊन गौरविण्यात आले आहे.
यापूर्वीही बुंदेले यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ही नोंद झाली होती. त्यांच्या या छंदाचे तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ही कौतुक आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीपक बुंदेले यांचा 'सन्मानपत्र' देऊन खास गौरव केला आहे. त्यांच्या अनेक वृत्तपत्रात तसेच टीव्ही, रेडिओ वर ही अनेक मुलाखती प्रसिध्द झाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना ‘युवा-भारत पुरस्कार’, पत्र-मित्र पुरस्कार, भारत सरकारतर्फे सुवर्ण जयंती पदक असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
फोटो - दीपक बुंदेले