विस्कटलेली सामाजिक वीण पूर्ववत करणार - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:16 AM2018-12-24T01:16:18+5:302018-12-24T01:16:40+5:30
१ जानेवारीला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राची विस्कटलेली सांस्कृतिक वीण पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तयारी केली आहे.
कोरेगाव भीमा : १ जानेवारीला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात झालेल्या दंगलीमुळे महाराष्ट्राची विस्कटलेली सांस्कृतिक वीण पूर्ववत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तयारी केली आहे. राज्यासह देशभरातून येणाऱ्या समाजबांधवांचे सामाजिक बांधिलकीतून परिसरातील स्थानिक नागरिक स्वागत करणार असल्याने महाराष्ट्राची सामाजिक एकतेची परंपरा कायम राहण्यास मदत होणार आहे, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
१ जानेवारीला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया नागरिकांच्या सुख-सुविधांची व विजयस्तंभ परिसर, तसेच कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक (ता. शिरूर) या परिसराची पाहणी करण्यासाठी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर रविवारी आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, लोणी कंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आदी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, ‘‘ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया नागरिकांसाठी ११ ठिकाणी वाहनतळ व इतर सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेची हमी प्रशासनावर असतानाच परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू देणार नाही. गतवर्षीच्या १ जानेवारीला असलेल्या पोलीस बंदोबस्तापेक्षा यावर्षी १० पटीने जास्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ’’
१ जानेवारीला ऐतिहासिक विजयस्तंभास महाराष्ट्रासह देशभरातून येणाºया समाजबांधवांच्या स्वागतासाठी पोलिसांनी परिसरातील गावोगाव बैठका घेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असल्याने सर्वत्र सामाजिक एकतेची भावना जागृत झाली आहे. त्यातूनच परिसरातील मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांचे फुले, पाणी देऊन स्वागत करणार असल्याचे
स्थानिक नागरिकांनीही आश्वासन
दिले असल्याने सामाजिक
एकतेचा संदेश महाराष्ट्रासह देशाला जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
मानवंदनेसाठी येणाºया बांधवांना सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. याचा आढावा पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे घेत आहेत. येथील खाण्यापिण्याची व्यवस्था, बसने अंतर्गत वाहतूक, १५० पाण्याचे टँकर, १० किलोमीटर अंतरावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेºयांसह ड्रोन कॅमेºयानेही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अग्निशमन, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत राज्य शासनाने यावेळी विशेष उपाययोजनाही केल्या असल्याने मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या वर्षी दरवर्षीपेक्षा जास्त बंदोबस्त असून सर्वाधिक पोलीस बंदोबस्त परिसरात असल्याचे सांगत प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाला स्थानिक मदतीसाठी अनेक गावांमध्ये शांतिदूत तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.
परिसराचा होणार मोठ्या प्रमाणावर विकास
१ जानेवारीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पेरणे, कोरेगाव भीमासह वढू बुद्रुक परिसराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात असतानाच या भागात मोठी औद्योगिक क्रांती झाली आहे. परिसरात शांतता असेल तर मोठमोठे उद्योग या ठिकाणी येऊन स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.