इंदापूर तालुक्यात हरणाची शिकार, तीन जण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:16 PM2019-09-30T17:16:38+5:302019-09-30T17:21:02+5:30

वनविभागाच्या जंगलात तीन जणांच्या टोळीने चिंकारा जातीच्या हरणाची शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Deer hunting in Indapur taluka and three persons in arrested | इंदापूर तालुक्यात हरणाची शिकार, तीन जण ताब्यात 

इंदापूर तालुक्यात हरणाची शिकार, तीन जण ताब्यात 

Next

इंदापुर : तालुक्यातील गागरगाव परिसरात आज दि (३०)सोमवारी सकाळी ११च्या सुमारास वनविभागाच्या जंगलात तीन जणांच्या टोळीने चिंकारा जातीच्या हरणाची शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयात हजर करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली .
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रदिप टेंब्या शिंदे, टेंब्या पोगर शिंदे, पापा टेगर पवार यांना रंगेहाथ पकडुन अटक केली आहे. गागरगाव बिजवडी (ता. इंदापुर) येथील परिसरात सकाळी ११ वाजता तिन संशयित आढळून आले. यावेळी अधिक माहिती घेतली असता त्यांनी चिंकारा जातीच्या हरणाची शिकार केल्याचे आढळून आले.यावेळी तत्काळ त्यांच्याकडुन शव ताब्यात घेण्यात आले असून यासाठी वापरलेली दुचाकी व जाळी ताब्यात घेतली आहे. वनविभागाचे वनपाल पांडुरंग चौधरी व कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न बाळगता आरोपींना पकडले. या परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून जंगलात चिंकाराचा नेहमीच वावर असतो. त्यात दुष्काळाच्या वन्यप्राण्यांना झळा बसत आहेत हरणाच्या कळप नेहमीप्रमाणे वावर आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Deer hunting in Indapur taluka and three persons in arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.