मनोरुग्णांसाठी उभारले ‘देवराई’ केंद्र
By Admin | Published: October 17, 2014 12:07 AM2014-10-17T00:07:34+5:302014-10-17T00:07:34+5:30
मनोरुग्णांवर उपचार केल्यानंतर ते पूर्णपणो बरे होतात; परंतु ब:या झालेल्या मनोरुग्णांना आजही त्यांचे कुटुंबीय स्वीकारण्यास तयार होत नाहीत.
पुणो : मनोरुग्णांवर उपचार केल्यानंतर ते पूर्णपणो बरे होतात; परंतु ब:या झालेल्या मनोरुग्णांना आजही त्यांचे कुटुंबीय स्वीकारण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे मनोरुग्णालयातील सुमारे 2क् वर्षाहून अधिक काळापासून राहत असलेल्या व मानसिकदृष्टय़ा स्थिर असलेल्या रुग्णांसाठी येरवडा मनोरुग्णालयाच्या आवारातच पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
काही महिन्यांमध्ये हे रुग्ण समाजात मुक्तपणो संचार करू शकणार आहेत, तसेच आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभे राहणार आहेत.
परिवर्तन संस्था व येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाने संयुक्तपणो इन्सेन्स प्रकल्पांतर्गत मनोरुग्णालयाच्या आवारातच ‘देवराई’ केंद्र सुरू केले आहे. ब:या झालेल्या मनोरुग्णांना विविध कौशल्य शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले जाणार आहे. तसेच, त्यांना रुग्णालयाबाहेरील जगात मुक्तपणो संचार करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मनोरुग्णालयातील खोल्यांमध्ये न ठेवता ब:या झालेल्या 5क् ते 6क् रुग्णांना या केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे.
या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तन संस्थेचे समन्वयक हमीद दाभोलकर, अमृत बक्षी, मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सध्या पुनर्वसन करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. स्वयंसेवी संस्थांनी या
उपक्रमासाठी मदत केली, तर
अनेक रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जीवन जगता येईल, असे नमूद करून डॉ. भैलुमे म्हणाले,
ब:या झालेल्या रुग्णांमध्ये अनेक
रुग्ण पदवीधर असून, त्यात
पीएच. डी. झालेल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. आता त्यांना केवळ आधार देण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
रुग्णांचे पत्तेच सापडत नाहीत
भैलुमे म्हणाले, ‘‘रुग्णालयात एका वर्षाहून अधिक कालावधीपासून राहत असलेल्या रुग्णांची संख्या 6क्क् आहे, तर 2क् वर्षाहून अधिक काळ राहत असलेले रुग्ण 22क् आहेत. त्यातील काही रुग्णांचे पत्तेच सापडत नाहीत. त्यामुळे या रुग्णांना संगणक, स्क्रिन प्रिंटिंग, ग्रिटिंग, आकाश कंदील, मेणबत्ती, तसेच बारपेठेतील मागणीनुसार आवश्यक असलेल्या वस्तूंची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिणामी, या रुग्णांना रोजगार उपलब्ध होईल. रुग्णालयातर्फे त्यांचे बँक खाते काढण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी कमावलेली रक्कम बँकेत जमा होणार आहे.’’
आता मानसिक आजारांवर अत्याधुनिक उपचार पद्धती आल्या आहेत. त्यामुळे मनोरुग्ण पूर्ण पणो बरे होतात. मात्र, त्यांचे कुटुंबीय तसेच समाज त्यांना स्वीकारत नाही. या रुग्णांना समाजाकडून दिली जाणारी वागणूक चुकीची आहे. त्यामुळेच ब:या झालेल्या मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करून समाजात मुक्तपणो वावरता यावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. - हमीद दाभोलकर, समन्वयक, परिवर्तन संस्था