Pune Crime: तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करून बदनामी, सदाशिव पेठेतील प्रकार
By भाग्यश्री गिलडा | Updated: June 15, 2024 15:53 IST2024-06-15T15:52:51+5:302024-06-15T15:53:20+5:30
याप्रकरणी शुक्रावरी (दि.१४) विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती आणि वेगवेगळ्या इन्स्टाग्राम खात्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Pune Crime: तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करून बदनामी, सदाशिव पेठेतील प्रकार
पुणे : तरुणीच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील व्हिडीओ तसेच फोटो टायर करून बनावट खात्याद्वारे व्हायरल केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रावरी (दि.१४) विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती आणि वेगवेगळ्या इन्स्टाग्राम खात्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार १४ जून रोजी घडला आहे. अनोळखी व्यक्तीने फिर्यादी तरुणीच्या फोटोचा आधार घेऊन तरुणीच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले. त्यानंतर इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्या खात्यावर मॉर्फ केले अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले. तसेच ते फिर्यादी तरुणी आणि तिच्या इतर फॉलोवर्सला अश्लील आणि बदनामीकारक मेसेज पाठवले.
हा प्रकार लक्षात आल्यावर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ करत आहेत.