महात्मा गांधीसह अनेक नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 02:12 PM2021-05-22T14:12:25+5:302021-05-22T14:13:19+5:30

आरोपींनी फेसबुकवर महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड केले.

Defamation by using offensive photos of political leaders including Mahatma Gandhi; Filed a crime against 5 people | महात्मा गांधीसह अनेक नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महात्मा गांधीसह अनेक नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड करुन बदनामी करणार्‍या ५ जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
साक्षी पुनावाला, प्रविण पाटील, विकी चांगरे, विजय तिवलकर, प्रविण आर नेरकर या फेसबुक प्रोफाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अश्विनी पाटील (वय ३०, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी फेसबुकवर राष्ट्रपिता महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह केलेले फोटो फेसबुवर अपलोड केले. त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून प्रसिद्ध करुन घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्वांच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य करुन जाणून बुजून त्यांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Defamation by using offensive photos of political leaders including Mahatma Gandhi; Filed a crime against 5 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.