धनंजय मुंडे, करुणा शर्मा यांचे फोटो टाकून फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:11+5:302021-09-12T04:14:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर ...

Defamatory post on Facebook with photos of Dhananjay Munde and Karuna Sharma | धनंजय मुंडे, करुणा शर्मा यांचे फोटो टाकून फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट

धनंजय मुंडे, करुणा शर्मा यांचे फोटो टाकून फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट करून त्यांची बदनामी करणाऱ्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल मुळे असे फेसबुक प्रोफाईल नाव असलेल्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८, रा. द्वारका अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १९ एप्रिल २०२१ पासून सुरू होता.

राहुल मुळे या फेसबुक वापरकर्त्याने त्याच्या खात्यावरून वेगवेगळ्या अश्लील व घाणेरड्या भाषेमध्ये पोस्ट केल्या. तसेच, त्याचे काही पोस्टला रिप्लाय देणाऱ्या लोकांना प्राण्यांचे पार्श्वभागाचे फोटो टाकून अश्लील व घाणेरड्या भाषेमध्ये रिप्लाय दिला आहे. त्यात काही पोस्टमध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये दृष्टता द्वेषाची भावना निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट टाकून चितावणीखोर भाष्य करून पोस्ट केली आहे. राज्यातील मंत्री धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचे नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट टाकून त्यांची बदनामी केली आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, अनिल देशमुख संजय राऊत, अमृता फडणवीस, अमोल मेटकरी, रोहित पवार यांच्याविषयी बदनामीकारक पोस्ट करुन कमेंटमध्ये बदनामीकारक पोस्ट केल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Defamatory post on Facebook with photos of Dhananjay Munde and Karuna Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.