उरुळी कांचन ग्रामपंचायतीत मातब्बरांचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:35+5:302021-01-19T04:12:35+5:30
तर विजयी उमेदवारात जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन यांचेे पती अमित कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांच्या ...
तर विजयी उमेदवारात जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन यांचेे पती अमित कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांच्या सूनबाई ऋतुजा कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन यांच्या पत्नी सीमा कांचन, अश्विनी कांंचन यांचे पती राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेेब तुपे यांच्या पत्नी अनिता तुपे, माजी उपसरपंच भाऊसाहेब कांचन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या १५ जानेवारीला झालेल्या अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणूक लढतीत १७ जागांपैकी प्रभाग क्रमांक ४ मधून सर्वसाधारण गटातील एका जागेवरील महिला बिनविरोध निवडून आल्याने १६ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते, सुमारे २५ हजार ४२७ मतदारांपैकी १६ हजार ८११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे सुमारे ६६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. विशेष महत्त्वाचे म्हणजे ९६७ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. आज या मतदानाची मोजणी पूर्ण होऊन ६ वार्डांमधील पुढील १७ जण ग्रामपंचायतीचा कारभार पुढील पाच वर्षांसाठी करण्यासाठी पात्र ठरले आहेत.
--
विजयी उमेदवार असे
प्रभाग क्रमांक १ मधून अमित भाऊसाहेब कांचन, स्वप्निशा आदित्य कांचन व मिलिंद तुळशीराम जगताप हे उमेदवार विजयी झाले आहेत, प्रभाग क्रमांक २ मधून राजेंद्र बबन कांचन, अनिता सुभाष बगाडे व ऋतुजा अजिंक्य कांचन यांनी बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक ३ मधून सुनील आबुराव तांबे व सायली जितेंद्र बडेकर यांनी विजय प्राप्त केला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधून संतोष हरिभाऊ कांचन व मयूर पोपट कांचन, हे निवडून आले असून या ठिकाणी सर्वसाधारण गटातील महिला सीमा दत्तात्रय कांचन या नविरोध निवडून आलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून संचिता संतोष कांचन, अनिता भाऊसाहेब तुपे व शंकर उत्तम बडेकर हे विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, प्रियंका वसंत पाटेकर (कांचन) व सुजाता चंद्रकांत खलसे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय प्राप्त केला आहे.