उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:54 AM2018-05-08T02:54:45+5:302018-05-08T02:54:45+5:30
उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी अनोखा निषेध केला. हिंगणगाव, अष्टापूर, शिंदेवाडी, प्रयागधाम या भागातील शेतकरी गेल्या १५ ते १८ दिवस झाले महावितरणच्या गचाळ नियोजनाने, कारभारामुळे जळालेली विद्युत जनित्रे न बसविल्याने वैतागले आहेत.
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी अनोखा निषेध केला. हिंगणगाव, अष्टापूर, शिंदेवाडी, प्रयागधाम या भागातील शेतकरी गेल्या १५ ते १८ दिवस झाले महावितरणच्या गचाळ नियोजनाने, कारभारामुळे जळालेली विद्युत जनित्रे न बसविल्याने वैतागले आहेत.
हवेली तालुक्यातील नदीकाठच्या गावांच्या शेतकºयांवर शेतातील उभी पिके जळताना बघण्याची वाईट स्थिती उद्भवली असल्याची तक्रार अष्टापूरचे विद्यमान सरपंच नितीन अंकुश मेमाणे यांनी केली आहे. प्रयागधाम येथील एक विद्युत जनित्र गेल्या १५ महिन्यांपासून मंजूर असूनही अद्याप बसविले नाही, ते तातडीने बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शेतात उभी असलेली पिके प्रचंड उन्हाच्या तडाख्याने नदीत पाणी असूनही केवळ विजेअभावी उपसा सिंचन योजनेच्या मोटारी चालू करता येत नाहीत या कारणामुळे डोळ्यांदेखत जळताना पाहताना डोळ्यात पाणी येत असताना महावितरणच्या भोंगळ व अनागोंदी कारभाराला वैतागून सोमवारी हे शेतकरी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्यांच्या कानावर गाºहाणे घालण्यासाठी आले असता, या ठिकाणी कोणीही कर्मचारी उपस्थित नसल्याने या शेतकºयांनी सुमारे एक ते दीड तास वाट बघून कोणीच आपली दाद-दखल घेत नाहीत.
या कारणास्तव चिडून जाऊन फुलांच्या दुकानातून एक हार आणून गांधीगिरी करीत उपकार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला.
उरुळी कांचन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्यांची त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी बदली केली आहे. त्यांच्या जागी अजूनही कोणाचीच नेमणूक केली नसल्याने या कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे. या उपविभागाचा कार्यभार अतिरिक्त स्वरूपात उरुळी कांचन शाखेचे (ग्रामीण) सहायक अभियंता व्यंकट गीर यांच्याकडे दिला आहे. त्यांना त्यांच्या शाखेचा कारभार करतानाच हा वरिष्ठ कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सांभाळताना जिकिरीचे होऊन गेले आहे असेच म्हणावे लागेल.
या अनोख्या निषेध आंदोलनात नितीन मेमाणे, पंडित जगताप, पुनाजी जगताप, राहुल कोतवाल, संदीप जगताप, गोरख चौधरी, विलास जगताप, दत्तात्रय जगताप, संजय चौधरी, तुकाराम बहिरट, विठ्ठल कोतवाल, संपत कोतवाल, राजेंद्र जगताप, बाळासाहेब चौधरी, शरद चव्हाण, सुभाष कोतवाल, ज्ञानोबा चौधरी, पोपट चौधरी, मुरलीधर आंबेकर इत्यादी शेतकºयांनी सहभाग घेऊन महावितरण प्रशासनाचा निषेध केला.
मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. बुंदेले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आज या भागात बसविण्यासाठी दोन जनित्रे देत आहोत व आणखी दोन जनित्रे येत्या दोन दिवसांत देण्याची व्यवस्था केली जाईल. त्या भागातील शेतकºयांच्या अडचणी सोडविण्यात येतील.
प्रभारी उपकार्यकारी अभियंता तथा सहायक अभियंता व्यंकट गीर यांच्याशी संपर्क साधला असता, मी वरिष्ठ कार्यालयात असलेल्या बैठकीसाठी चाललो असल्याने कार्यालयात उपस्थित नाही. पण या शेतकºयांच्या भावना समजू शकतो. त्यांना लवकरात लवकर विद्युत जनित्रे बसवून देऊन त्यांची समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे.