सीबीआय ने महत्वाचे पोलीस अधिकारी मुद्दामून तपासले नाहीत, बचाव पक्षाचा आरोप
By नम्रता फडणीस | Published: March 13, 2024 09:25 PM2024-03-13T21:25:43+5:302024-03-13T21:26:03+5:30
पुणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांना जर मागून गोळ्या झाडल्या असतील तर एक गोळी ...
पुणे : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांना जर मागून गोळ्या झाडल्या असतील तर एक गोळी समोरच्या भुवई
मधून घुसून मागे कशी आली? याचा अर्थ गोळी समोरून मारली असली पाहिजे. पण नेमकी तीच गोळी कशी मिळत नाहीये. सीबीआय ने महत्वाचे पोलीस अधिकारी
मुद्दामून तपासले नाहीत असा आरोप बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बुधवारी केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये बचाव पक्षातर्फे ॲड. वीरेंद्र
इचलकरंजीकर यांनी अंतिम युक्तिवाद केला. किरण कांबळे या साक्षीदाराने २०१८ मध्ये न्यायालयाला सांगितले होते की मी सचिन अंदुरे याला गोळ्या
झाडताना स्वतः: पाहिले नव्हते. शरद कळसकर याचाही फोटो वृत्तपत्रात पाहून त्याला ओळखले होते. तसेच किरण कांबळे आणि विनय केळकर या दोघांच्याही
साक्षीमध्ये तफावत असल्याचे आढळले आहे.
कांबळे याने मान्य केले की तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत जेवायलाही जायचा. तसेच
केळकर याने मान्य केले आहे की अंनिस वाले माझ्याकडे आले होते, याकडे बचाव पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बचाव पक्षाचा
युक्तिवाद सुरूच राहणार असून, पुढील सुनावणी दि. २३ व २४ मार्च रोजी होणार आहे.