खडकी जोडरस्त्याच्या ‘एनओसी’स संरक्षणमंत्री सहमत

By Admin | Published: June 9, 2015 06:17 AM2015-06-09T06:17:22+5:302015-06-09T06:17:22+5:30

बोपखेलच्या तात्पुरत्या पुलासाठी खडकीच्या बाजूने संरक्षण हद्दीतील जोडरस्त्याचे ना हरकत पत्र (एनओसी) देण्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सहमती दिली आहे.

The Defense Minister agreed with the NOC of the Khadki combine | खडकी जोडरस्त्याच्या ‘एनओसी’स संरक्षणमंत्री सहमत

खडकी जोडरस्त्याच्या ‘एनओसी’स संरक्षणमंत्री सहमत

googlenewsNext

पिंपरी : बोपखेलच्या तात्पुरत्या पुलासाठी खडकीच्या बाजूने संरक्षण हद्दीतील जोडरस्त्याचे ना हरकत पत्र (एनओसी) देण्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सहमती दिली आहे. त्यामुळे लष्कराच्या अतिसंवेदनशील भागातून नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे. मात्र, कायमस्वरूपी मार्गाच्या तोडग्यावर आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बोपखेल-खडकी बाजार रहदारीसाठी सीएमईने तरंगता पूल बांधून दिला. त्यावरून रविवारपासून वाहतूक सुरू झाली. या संदर्भात संरक्षणमंत्री पर्रिकर यांच्यासमवेत सोमवारी सकाळी पुण्यात बैठक झाली. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, सीएमई, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी,डिफेन्स इस्टेट, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, मंगला कदम, नगरसेवक संजय काटे, चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.
तात्पुरत्या रस्त्याची माहिती पर्रिकर यांना देण्यात आली. तात्पुरत्या रस्त्यावर सध्या बोलू, कायमस्वरूपी रस्त्यासाठी पुढील बैठकीत चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
तात्पुरत्या पुलाच्या खडकी बाजूच्या ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या जोडरस्त्यासाठी एनओसी
नसल्याने महापालिकेस डांबरीकरण आणि पथदिव्याचे काम करता येत नसल्याचे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी बोपखेल आणि खडकीतील नागरिकांनी तात्पुरत्या मार्गावरुन वाहतूक केली. त्यात आज वाढ झाली. खडकी बाजारपेठेतून खरेदीचा आनंद नागरिकांनी घेतला.सध्याचा जोडरस्ता थेट ५१२ वर्कशॉप आणि अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावरुन जात असल्याने तो बदलून ५१२ वीज उपकेंद्राच्या शेजारून घेण्यात येणार आहे. हा जोडरस्ता सुमारे ५०० मीटरपर्यंतचा आहे. रस्ताचे एनओसी लष्कराच्या विविध विभागाकडून त्वरित खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डास देण्याच्या सूचना पर्रिकर यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बोर्डाकडून एनओडी महापालिकेस देण्यात येणार आहेत. यामुळे तात्पुरत्या रस्त्यातील जोडरस्त्याचा उर्वरित प्रश्न मार्गी लागला आहे.

Web Title: The Defense Minister agreed with the NOC of the Khadki combine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.