छत्रपती शिवरायांचा दाखला देताना ‘चुकले’ संरक्षण मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:16 AM2021-08-28T04:16:21+5:302021-08-28T04:16:21+5:30
संरक्षण मंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि.२७) राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुण्यातील घोरपडी येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या (एएसआय) मैदानाला टोकियो ऑलिंपिdमध्ये सुवर्णपदक ...
संरक्षण मंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि.२७) राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुण्यातील घोरपडी येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या (एएसआय) मैदानाला टोकियो ऑलिंपिdमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या सुभेदार नीरज चोप्राचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या पौराणिक इतिहासातही खेळांचा समावेश होता. युद्धविद्या शिकणाऱ्यांच्या अभ्यासक्रमात तलवारबाजी, तिरंदाजी, भालाफेक, बुद्धिबळ आदी खेळ होते. नालंदा, तक्षशीला विद्यापीठात क्रीडाप्रकार शिकण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत. राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज बनून राष्ट्रनायक बनले. त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाई, राणी चेलम्मा, दुर्गावती यांच्या जीवनातही खेळांना महत्त्व होते. हीच परंपरा आता भारतीय लष्कर पुढे नेत आहे.”
दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या बालपणात समर्थ रामदास यांचा त्यांच्याशी संपर्क आल्याचा कोणताही दाखला उपलब्ध नाही. तरी पुण्यात बोलताना राजनाथ सिंह यांनी हा चुकीचा उल्लेख केला असल्याची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे.